kinwat today news

नंदिग्राम एक्सप्रेस व कृष्णा एक्सप्रेस ह्या रेल्वे गाड्या सुरु करण्या संबधी दिल्ली येथे खा.सोयम बापूराव यांनी दिले निवेदन

किनवट ता.प्र दि १० आदिलाबाद चे खासदार सोयम बापुराव यांनी आज देशाचे रेल्वेमंत्री सोयम बापुराव यांना नंदिग्राम एक्सप्रेस व कृष्णा एक्सप्रेस ह्या रेल्वे गाड्या सुरु करण्या संबधी दिल्ली येथे निवेदन दिले आहे.
       देशात व राज्यात अनलॉक ५ सुरु झाले आहे याचा अर्थ असा होतो कि कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे जे लॉकडाऊन मुळे जनजिवन विस्कळीत झाले होते ते आता पुर्वपदावर येत आहे या अणुषंगाने राज्याच्या विविध भागात रेल्वेसेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. परंतु किनवट आदिलाबाद मार्गावर एक रेल्वे सुरु करण्याचे आता पर्यंत घोषीत झाले नसल्याने या परिसरातील नागरीकांना अनंत अडचणीना सामोरे जावे लागत आहे. आजच्या स्थितीत किनवट व परिसरातुन राज्यात व देशात कोठे ही प्रवास करायचे असल्यास खाजगी वाहन घेऊनच प्रवास करावा लागतो त्यामुळे हे खुप खर्चिक झाले आहे अशा स्थितीत किनवट व परिसरातील रेलसेवा पुन्हा सुरु करण्या करिता येथिल लोकप्रतिनिधींना पाठपुरावा करण्यासंबधी नागरीकांनी विनंती केली परंतु महाराष्ट्राच्या कोणत्याही लोकप्रतिनिधींना रेल्वे प्रश्नी पाठपुरावा करण्यासाठी वेळ मिळाला नाही परंतु या संबधी जेव्हा आदिलाबाद चे खासदार सोयम बापुराव यांना नागरीकांनी दुरध्वनी वरुन समस्या सोडवण्यासंबधी मागणी केली तेव्हा त्यांनी तत्काळ स्वरुपात दखल घेत आदिलाबाद, किनवट करिता रेल्वे सुरु करण्यासंबधी निवेदन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना दिले आहे. व रेल्वे मंत्री यांनी त्यांना याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यामुळे रेल्वे सेवा सुरु होण्यासंबधी नागरीकांच्या आशा पल्लावित झाल्या आहेत.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply