kinwat today news

द पॉवर ऑफ मीडियाचे तालुका उपाध्यक्ष कार्तिक बेहेरे यांना पितृशोक.

श्रीक्षेञ माहुर /वाई बाजार येथील माजी सरपंच व गुरुदेवांना अपेक्षित प्रचारक, अभ्यासू व्यक्तिमत्व तथा द पॉवर ऑफ मीडियाचे तालुका उपाध्यक्ष कार्तिक बेहेरें यांचे वडील शंकरराव भगवानराव बेहेरे( वय ७८ )यांचे ७ ऑक्टोंबर रोजी पहाटे ५:३० वाजता निधन झाले.

प्रतिष्ठित व्यक्ती दिवंगत शंकरराव भगवानराव बेहेरे यांच्यावर मागील काही दिवसा पासून नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान बुधवारला त्यांची प्राण ज्योत मालवली. श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्याची कृतिशील चळवळ त्यांनी वाई बाजार परिसरात राबवली होती. ग्राम राज्य संरक्षण दल, आदर्श ग्राम रचना, ग्रामगीता प्रणित सक्षम ग्रामसभा,व्यसनमुक्ती व अनेक पोथी-पुराणाचे त्यांनी वाचन केले असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार घराघरात पोहोचवून अनेक ठिकाणी सामुहिक प्रार्थना सुरु केली होती.
त्यांचे पश्चात पत्नी ,३ मुले १ मुलगी, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply