kinwat today news

केंद्र शासनाचीआधारभूत किंमत खरेदी योजना 1 नोव्हेंबर पासून चिखली जलधारा येथे सुरु करा-शेतकऱ्यांचे तहसीलदाराना निवेदन

किनवट/ प्रतिनिधी: खरीप पनन हंगाम 2020 मध्ये आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत भरडधान्य ज्वारी, मका खरेदी केंद्र किनवट तालुक्यात जलधरा चिखली येथे चालू करणे यावे यासाठी येथील तहसीलदार उत्तम कागणे याना निवेदन सादर करण्यात आले.
आधारभूत किंमत खरेदी योजना ही केंद्र शासनाची योजना असून हमीभावापेक्षा कमी किमतीने धान्य विकावे लागू नये म्हणून ही योजना राबविण्यात येते किनवट परिसरात मका ,ज्वारी उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते बाजारपेठेत मका, ज्वारी यांची काडीमोलाने खरेदी होत आहे.
त्यामुळे किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ होईल यासाठी 1 नोव्हेंबर 2020 पासून चिखली जलधरा याठिकाणी भरड धान्य खरेदी केंद्र चालू करण्यात यावे अशी विनंती शेतकरी कर्तार देविसिंग साबळे,संतोष घुगे ,रमेश साबळे अंकुश साबळे आदींनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply