kinwat today news

महाकरिअर पोर्टल आता अँड्रॉइड ॲप मध्ये उपलब्ध;उज्ज्वल भवितव्यासाठी विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा -उपसंचालक दीपक माळी

किनवट / प्रतिनिधी : महाकरिअर पोर्टल आता अँड्रॉइड ॲप मध्ये उपलब्ध झाले अजून आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्ही. जी. पी.जी. विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणेचे उपसंचालक दीपक माळी यांनी केले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड, शिक्षण विभाग, पंचायत समिती, किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थी,शिक्षक, पालक, मुख्याध्यापक, क्षेत्रीय अधिकारी या सर्वांसाठी महाकरिअर पोर्टल ॲक्सेस करण्याबाबत ऑनलाइन कार्यशाळा दिनांक 5 ते 9 ऑक्टोबर 2020 या कालावधीत सकाळी व संध्याकाळी दोन सत्रात आयोजित करण्यात आलेली आहे. किनवट तालुक्यातील शिक्षक, विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते .
या कार्यशाळेसाठी डायटचे प्राचार्य डॉ. रविंद्र अंबेकर, शिक्षणाधिकारी (प्रा.) प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी(मा. ) बालाजी कुंडगीर, शिक्षणाधिकारी (मनपा ) दिलीप बनसोडे, उप शिक्षणाधिकारी माधव सलगर, डॉ. दत्तात्रय मठपती, बंडू आमदुरकर, यांचे मार्गदर्शन लाभले आहे. डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, तालुका संपर्क अधिकारी म्हणून या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी सर्व तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती, समावेशित विषय तज्ञ, विशेष तज्ञ, तंत्रस्नेही शिक्षक यांच्या सहकार्याने कार्य करत आहेत.


नांदेड जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावी वर्गाचे वर्गशिक्षक,विषय अध्यापन करणारे शिक्षक, शाळेचे मुख्याध्यापक/ प्राचार्य यांच्यावतीने विद्यार्थ्यांपर्यंत त्यांचा सरल आयडी उपलब्ध करून देऊन पोर्टल वेबिनार विषयी माहिती दिली जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या वेबिनारचा लाभ मिळावा म्हणून शिक्षक, मुख्याध्यापक स्वतः मोबाईल घेऊन वाडी-वस्ती, तांडे,पाल या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देत आहेत. व्ही. जी. पी. जी. विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणेचे उपसंचालक दीपक माळी व विभाग प्रमुख श्याम राऊत यांनी ऑनलाईन वेबिनार मध्ये मार्गदर्शन करताना सांगितले की, महाकरियर पोर्टल महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, युनिसेफ आणि आशमा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे पोर्टल तयार करण्यात आले असून (ता.22 मे 2020 ) शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन झाले.दोन दिवसापूर्वीच या पोर्टलचे अँड्रॉइड मोबाईल वर ॲप लॉन्च झाले असून विद्यार्थ्यांनी प्ले स्टोअर वर जाऊन सदर ॲप डाऊनलोड करून घेण्याचे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले. प्रत्येक शाळेतील इयत्ता नववी ते दहावी या वर्गासाठी एक शिक्षक आणि अकरावी व बारावी या वर्गासाठी एक शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना देखील या पोर्टलवर ॲक्सेस करता येण्याची संधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. नांदेड जिल्ह्यातील डायट, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड, शिक्षण विभाग, गट साधन केंद्र सर्व यांनी घेतलेल्या पुढाकाराचे याप्रसंगी त्यांनी अभिनंदन केले असून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने आतापर्यंत शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक, पालक यांच्यासाठी राज्य स्तरावरून चार वेबिनार आयोजित केल्याचे व या चार वेबिनारचे व्हिडीओ क्लिप्स एस. सी. ई.आर. टी.( विद्या परिषद ) च्या यूट्यूब चैनल वर व्हिडिओ उपलब्ध असून या व्हिडिओचा देखील लाभ सर्वांनी घ्यावा तसेच नांदेड जिल्ह्यातील मुख्याध्यापक शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना त्यांचा सरल आयडी उपलब्ध करून द्यावा असे आवाहन याप्रसंगी केले.दहा ते तीस वर्षाचा अनुभव असणारे राज्यातील विविध जिल्ह्यातील तज्ज्ञ मार्गदर्शक / समुपदेशक तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक यांना करियर निवड, महाकरियर पोर्टल, महाकरियर पोर्टलचे अँड्रॉइड ॲप ई. बद्दलची माहिती आणि मार्गदर्शन करत आहे. करियर निवडीसाठीची सप्तसूत्री, आवड, अभिरुची, अभियोग्यता, कलचाचणी, स्वभाव, व्यक्तिमत्व, बुद्ध्यांक, याबाबत विस्तृत माहिती देऊन करिअर निवडताना घ्यावयाची दक्षता,पोर्टल मध्ये उपलब्ध असलेली माहिती, करियर, कॉलेजेस, पात्रता परीक्षा, शिष्यवृत्ती इत्यादी टॅबमध्ये उपलब्ध असलेली माहिती दिली जात आहे. प्रत्येक सेशनच्या शेवटी विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जात आहेत.
किनवट तालुक्यासाठी मुंबईचे जयवंत कुलकर्णी, स्मिता शिपूरकर व श्री संतोष केंद्रे हे समुपदेशक प्रत्यक्ष पीपीटी द्वारे, लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.किनवट तालुक्यातील वेबिनारचे नियोजन गटशिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने व त्यांच्या टीमने केले आहे. विद्यार्थ्यांना करियर पोर्टल ऍक्सेस करताना येणाऱ्या कोणत्याही अडचणीचे समाधान करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड, जिल्ह्यात व राज्यात उपलब्ध असलेल्या कोणत्याही तज्ञ समुपदेशकास संपर्क साधण्याचे आवाहन याप्रसंगी या कार्यशाळेतून करण्यात येत आहे. समुपदेशकांची यादी महाकरियर पोर्टल वर उपलब्ध असून व्हाट्सअपच्या माध्यमातून देखील त्यास प्रसिद्धी देण्यात आलेली आहे. नांदेड जिल्ह्यात सुदर्शन बिगेंवार, तुकाराम मुगरे, बसप्पा करखेडे, परमेश्वर सोळुंके, बालाजी पाटील समुपदेशक म्हणून उपलब्ध आहेत. ज्येष्ठ अधिव्याख्याता किसन देशमुख व जिल्हा समुपदेशक बालासाहेब कच्छवे, जिल्हा समुपदेशक या कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.शी माहिती तालुका संपर्क अधिकारी तथा अधिव्याख्याता अभय परिहार यांनी दिली.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply