kinwat today news

२००५पूर्वी विनाअनुदानित,अंशत: अनुदानित नियुक्त तदनंतर १००% अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जुन्या निवृत्ती वेतनाचा प्रश्न निकाली काढण्यात येणार – आ.सतीश चव्हाण.

किनवट प्रतिनिधी: औरंगाबाद विभाग पदवीधर चे आमदार मा. सतिषभाऊ चव्हान हे दि.४/अक्टो/२०२० रोजी किनवट दौऱ्यावर असतांना किनवट येथे जुनी पेन्शनच्या प्रश्नासंदर्भात येथील शिक्षक कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी संवाद साधून २००५पूर्वी विनाअनुदानित,अंशत: अनुदानित नियुक्त तदनंतर १००% अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जुन्या निवृत्ती वेतनाचा प्रश्न निकाली काढण्यात यावा यासंबंधी चर्चा केली. या प्रसंगी ता. किनवट चे शिल्लेदार श्री सतिष राऊत सर ,असद पठाण सर व लाईक सर उर्दू व इतर.उपस्थित होते.
यांच्या भेटी दरम्यान मा.आमदार सतिश चव्हाण यांनी २००५पूर्वी विनाअनुदानित,अंशत: अनुदानित नियुक्त, तदनंतर १००%अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जुन्या निवृत्ती वेतनाचा प्रश्न निकाली लागणार याबद्दल तिळमात्र शंका बाळगण्याचे कारण नाही.
अशा प्रकारचे ठोस आश्र्वासन दिले.या मुळे जुनी पेन्शन योजना पासून वंचित असलेल्या लाखो शिक्षकांच्या आशा उंचावल्या आहेत.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply