kinwat today news

ग्रामिण रुग्णालय मांडवी करिता रुग्णवाहिका चे लोकार्पण;आ.भिमराव केराम यांच्या हस्ते संपन्न

किनवट ता.प्र दि ५ आमदार स्थानिक विकास निधी मधुन ग्रामिण रुग्णालय मांडवी करिता रुग्णवाहिका चे आज लोकार्पण नांदेड येथे आ.भिमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आले. आ.भिमराव केराम यांच्या पाठपुराव्यामुळे किनवट माहुर विधानसभा क्षेत्रास एकूण आठ रुग्णवाहीका मिळणार आहेत. त्यातील आमदार स्थानिक विकास निधी मधुन ग्रामिण रुग्णालय मांडवी, उपजिल्हा रुग्णालय गोकूंदा, ग्रामिण रुग्णालय माहुर येथे प्रत्येकी एक रुग्णवाहीका व जिल्हा वार्षिक आदिवासी उपाय योजना मधुन एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय किनवट व्दारे प्राथमिक आरोग्य केंद्र वाई, वानोळा, ईस्लापुर, बोधडी, उमरी बा. येथे प्रत्येकी एक अशा प्रकारे एकुण ८ रुग्णवाहीका लवकरच मतदारसंघाला प्राप्त होतील त्याची सुरवात आज नांदेड येथे आ.भिमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आली तर अशी माहीती भाजपा शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार यांनी दिली.
      आ.भिमराव केराम यांच्या निवडणुकीतील विजया नंतर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाला त्यामुळे सर्वत्र लॉकडाउन जाहीर करण्यात आला त्यामुळे दरम्यान चा कालावधी कोणत्याही योजना आमलात आणण्यासाठी हालचाली करता आली नाही परंतु आता जनजिवन हळुहळु पुर्वपदावर येत आहे त्यानंतर आ.भिमराव केराम यांनी आपल्या विकासात्मक दृष्टीकोणातुन मतदारसंघातील नागरीकांच्या गरजा ओळखुन प्राथमिक गरजा पहिले पुर्ण करण्याकडे आपला कल दाखवला आहे त्यापुढे ही त्यांच्या कडुन जनतेच्या प्राथमिक गरजा व कष्टकरी शेतक-यांच्या प्रश्नांना सोडवण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जातील असे त्यांच्या या रुग्णवाहिकांच्या कार्यक्रमा मधुन दृष्टीस येत आहे कारण त्यांनी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव देशात व राज्यात होण्या आधीच रुग्णवाहिकां देण्याचे नियोजन केले होते. मतदारसंघातील नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे काहीअंशी सुटणार आहे कारण किनवट माहुर हा मतदारसंघ जिल्ह्याच्या ठीकाणापासुन १५० कि.मी एवढ्या अंतरावर आहे तर तालुक्यापासुन जिल्हा रुग्णालय हे १६० कि.मी अंतरावर आहे त्यामुळे कोणत्याही गंभीर परिस्थिती मध्ये रुग्णाला रुग्णालयात पोहचण्यासाठी ह्या रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहेत. भौगोलिक दृष्ट्या मतदारसंघ मोठा असुन एका प्राथमिक आरोग्य केंद्रा पासुन दुस-या व तिथुन उपजिल्हा रुग्णालय त्यानंतर जिल्हा रुग्णालय ही कसरत आता सर्व रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या नंतर बंद होणार आहे.
      यासोबतच आ.केराम यांच्या विकसनशील दृष्टीने येत्या काळात मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे स्थानिक तरुणांना रोजगार, विविध प्रशिक्षण केंद्र , शैक्षणिक अभ्यासक्रम व उद्योगाचे प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यावर भर असणार आहे त्यामुळे मतदारसंघातील नागरीकांना कामा निमित्त इतर ठीकाणी भटकंती करण्याची गरज भासणार नाही तर विद्यार्थ्यांना शिक्षणाकरीता इतर ठीकाणी जावे लागणार नाही या बाबींची पुर्तता लवकरच करण्यावर भर असणार असल्याचे त्यांच्याकडुन कळाले आहे.
      यावेळी जिल्हाशल्यचिकित्सक निळकंठ भोसीकर, शिवसेनेचे सचिन नाईक, भाजपा नेते अनिल तिरमनवार, सदाशिव राठोड यांच्यासह जिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply