kinwat today news

लहू सेनेच्या वतीने बलात्कार पीडीत मृतक मनीषा वाल्मिकी यांना श्रद्धांजली अर्पण

नागपूर: लहू सेनेच्या वतीने बलात्कार पीडीत मृतक मनीषा वाल्मिकी यांना श्रद्धांजली अर्पण करून निषेध सभा संपन्न झाली. हातरस यूपी येथील क्रूर अमानवीय घटनेचा निषेध करून बलात्कार पीडित मृतक युती मनीषा वाल्मीकि यांना लहू सेनेच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करून वस्तीतून कॅन्डल मार्च काढून अण्णाभाऊ साठे चौक येथे निषेध सभा घेण्यात आली. याप्रसंगी आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली.
या सभेचे अध्यक्ष लहू सेना प्रमुख संजय भाऊ कठाळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून विलास वाटकर, प्रकाश मेश्राम, सुशील बावणे, नकुल ढोके, मनू गायकवाड, दीपक गायकवाड, जितेंद्र डोंगरे, सुधीर परांजपे,श्रीमती इंदिरा बावणे, दुर्गा ढोके, गायकवाड ताई इत्यादी मान्यवरांची भाषणे झाली.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply