kinwat today news

प्रचलित नियमानुसार शाळांना अनुदान, नंतरच करणार मतदान

किनवट: मराठवाडा पदवीधर मतदार संघ, औरंगाबाद चे आमदार मा. सतिश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चा सञ आयोजित करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना आमदार चव्हाण साहेबांनी आपल्या मागील सहा वर्षांत केलेल्या कामाचा लेखाजोखा उपस्थितां समोर मांडला, यादरम्यान म. रा. का. वि. अ. शाळा कृती समिती किनवटचे अध्यक्ष श्रीअरविंद राठोड यांनी विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठीचे निवेदन देवुन त्या बाबत सविस्तर चर्चा केली. त्या प्रश्नांची उत्तरे देतांना आमदार सतिश चव्हाण यांनी येत्या बुधवार पर्यंत होणाऱ्या कॅबिनेटमध्ये विनाअनुदानित शिक्षकांच्या अनुदानावर शिक्का मोरतब होणारच असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. याबाबत काहीच शंका बाळगू नकाअसे बोलताच अरविंद राठोड यांनी असा सवाल केला की, “आधी प्रचलित धोरणात्मक अनुदान नंतरच करणार मतदान” 4आॅक्टो.2016 रोजी औरंगाबाद येथे शिक्षकांवर झालेल्या बेछूट लाठीचार्ज करणाऱ्या शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. अनुदानाच्या टप्पा वाढ फाईल तयार असल्याचे आ. चव्हाण साहेबांनी सांगितले.अनुदान देतांना प्रचलित धोरणाचा स्विकार व्हावा असा आशावाद व्यक्त केला आहे. प्रमुख मागणी प्रचलित नियमाने अनुदान, आदिवासी उपयोजन क्षेत्रातील शाळांना 100 %अनुदान, अघोषित माध्यमिक व उच्च माध्यमिक व प्राथमिक शाळांना निधीसह अनुदान, नैसर्गिक वर्ग तुकड्यांना अनुदान देण्यात यावे. यावेळी संघटनेचे पि. व्ही. शिंदे, संतोष नागरगोजे सर, संतोष डवरे, केंद्रे सर, अशिष कराळे सर, एम. एम. मुंडे सर, रमेश राऊलवार सर, नवीन राठोड साहेब, अभि. प्रशांत ठमके साहेब,मा. शिवसेना नेते किनवट बालाजी मुरकुटे, रा. काॅ. चे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड, विनोद भरणे, कचरु जोशी, आणि दै. मराठवाडा नेता तालुका प्रतिनिधी मा. बालाजी सिरसाट आदी उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply