श्रमदानातून दगडी बांध उभारला.   मॉर्निंग वॉक समूह किनवट कडून पैनगंगा अभयारण्य खरबी येथे वन्यजीव सप्ताह साजरा.

किनवट 🙁 प्रतिनिधी)
मॉर्निंग वॉक समुह व वन परिक्षेत्र कार्यालय खरबी यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह निमीत्त दि. 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजत पैनगंगा अभयारण्य खरबी येथे श्रमदान करण्यात आले.किनवट पासून हाकेच्या अंतरावर असलेले मेळघाट व्याघ्र प्रकल्प(वन्यजीव) अमरावती अंतर्गत वनपरिक्षेत्र कार्यालय खरबी येथे नागरिकांमध्ये वन्यजीवांविषयी जागृती व्हावी म्हणून वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. या अनुशंगाने काही दिवसापूर्वी सामाजीक कार्यातअग्रेसर असलेले किनवट मॉर्निंग वॉक समूहाकडून खरबी परिसरातील केर-कचरा उचलण्यात आला होता; या कार्याची दखल घेत वन विभागाच्या अधिकार्‍यांनी या समूहाला आवाहन केले.

यास प्रतिसाद देत वनकर्मचारी व मॉर्निंग वॉक समुहातील सदस्यांकडून संयुक्तिक रित्या श्रमदान करुन 10 मी. लांबीचे दगडी बांध तयार करण्यात आले आहे. यामुळे मातीची धूप रोखण्यासाठी मदत होणार असून वन्यप्राण्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. या वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन आटपाडकर, वनक्षेत्रपाल भीसे, वनरक्षक वाघमारे, राहूल यादव, अक्षय घायवट, शंकर देवडे, तोसिफ पठाण, पंकज राठोड, महेबूब पठाण, विजेंद्र सोनवण, कानडे, खोंड, चंद्रे मॅडम, बालाजी बोईनवाड तर मॉर्निंगवॉक समुहातील अभय महाजन, बाळकृष्ण कदम, संजय नेम्मानिवार, डॉ.सुंकरवार, संजय मेहता, रामदेव शर्मा, चेतन पंड्या, राजकिरन नेम्मानिवार, राजेंद्र भातनासे, सिद्धांत नगराळे, संजय धोबे, कृष्ण कंचर्लावार, अधिराज कदम आदींनी श्रमदान केले. तसेच पर्यावरण व वन्यजिवांच्या रक्षणासाठी लोकसहभा आवश्यक आहे. या पुुढेही असेच सहकार्य आपणाकडून अपेक्षित असून आपण वेळात वेळ काढून श्रमदान केल्याबद्दल खरबी वनपरिक्षेत्र अधिकारी आटपाटकर यांनी मॉर्निग वॉक समुह किनवटचे आभार मानले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.