kinwat today news

किनवट तालुक्यातील दिव्यांगा चा निधी थेट लाभार्थींना मिळावा

किनवट प्रतिनिधी: किनवट तालुक्यातील 134 ग्रामपंचायती अंतर्गत दिव्यांग लाभार्थी हाप्रत्येक गावात वास्तव्यास आहे शासनाने दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक वेळा शासनाच्या वतीने शासन परिपत्रके काढून दिव्यांगा चा निधी थेट लाभार्थींना मिळावा या उद्देशाने तालुक्यातील 134 ग्रामपंचायतीअंतर्गत ग्रामसेवक का मार्फत सन 2016 पासून गावपातळीवर दिव्यांगाची यादी तयार करून ग्रामपंचायतीत केंद्र व राज्य शासनाच्या तसेच गावातील ग्रामनिधी यांच्या एकूण रकमेच्या तीन टक्के व पाच टक्के निधी दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासावर खर्च करण्यात संबंधाने शासन स्तरावरून शासन परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले होते परंतु ग्रामसेवकांनी 2016 पासून एकाही ग्रामपंचायतीने सदर दिव्यांग यांचा निधी वाटप न करता सर्व रक्कम सौ हितासाठी वापरून दिव्यांगाच्या निधीवर करोडो रुपयांचा घोटाळा करत दरोडा घालण्याचे काम केले आहे असे अखिल भारतीय अपंग कामगार संघटनेचे तालुका सचिव राज माहुरकर यांनी निवेदनाद्वारे पत्रव्यवहार केला असून त्याच्या प्रती महाराष्ट्राचे राज्यपाल व मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी नांदेड, महालेखाकार मुंबई, सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट, व इतर विभागांना देण्यात आले आहे.या निवेदनाच्या अनुषंगाने तालुक्यातील आजी-माजी आमदारासह सर्वच लोकप्रतिनिधींचे लक्ष याकडे लागले असून सदरचा निधी दिव्यांगांना मिळतो की नाही याबाबत तर्क-वितर्क बोलल्या जात आहे

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply