kinwat today news

दहेली येथील नंदेश दामोदर बोधले यांच्या शेतात जाण्यासाठी वाट मोकळी करून दयावी या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण

किनवट प्रतिनिधी: दहेली येथील नंदेश दामोदर बोधले यांच्या शेतात जाण्यासाठी अडथळा निर्माण केलेल्या रस्त्या ची वाट मोकळी करून द्यावी यासाठी किनवट तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून अद्याप पर्यंत काहीही कारवाई झालेली नाही.त्यामुळे आज दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी किनवट येथील उपविभागीय कार्यालयासमोर नंदेश दामोदर बोधले हे उपोषणास बसले आहेत.
मौजे दहेली तालुका किनवट येथील शेत सर्वे नंबर 426 मध्ये जाण्या-येण्यासाठी गैर अर्जदाराने अडथळा निर्माण केल्याने सदर चा रस्ता मोकळा करून मिळण्याबाबत चा तहसील कार्यालय, किनवट कडे दावा दाखल केला होता यानुसार किनवट तहसील कार्यालयाकडून प्रत्यक्ष जयमोक्यावर जाऊन पाहणी करून नियमानुसार कार्यवाही करुन अनुपालन अहवाल कार्यालयात सादर करण्यात आला. परंतु या विभागातील मंडळ अधिकाऱ्यांनी या आदेशाची अंमलबजावणी न करता अद्यापपर्यंत हे प्रकरण जसेच्या तसे ठेवले आहे त्यामुळे अर्जदार हे आज रोजी उपविभागीय कार्यालयासमोर आपल्या न्याय मागणीसाठी उपोषणास बसलो असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply