kinwat today news

लाकूड कापणाऱ्या मशीनच्या कर्कश आवाजामुळे व लाकडी भुशाच्या धूळ कनामुळे जगणे मुश्कील; कार्यवाही ची मागणी

किनवट प्रतिनिधी: किनवट शहरातील साईनगर मानव वस्ती मध्ये साईनगर मानववस्ती मध्ये फर्निचर चे काम करणाऱ्या कारागिराची विनापरवाना अनधिकृत दुकाने आहेत त्यातील लाकूड कापणाऱ्या मशीनच्या कर्कश आवाजामुळे व लाकडी भुशाच्या धूळ कनामुळे जगणे मुश्कील झाले असून सदर फर्निचर मार्टवर कारवाई करावीअशी मागणी किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष अर्जुन आडे, मोहन जाधव, यु. बी. राठोड केली आहे.
यासंदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी, पालिकेचे मुख्याधिकारी, सहाय्यक निबंधक यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,शहराच्या साईनगर ,रेल्वेस्थानक रस्त्यावर विनापरवाना सुतारकाम करणारे तसेच लाकडी फर्निचर तयार करणारे दुकाने आहेत. त्यांच्याकडे दिवसभर , सातत्याने चालणाऱ्या मशिनमुळे व लाकडी धुळीमुळे वायू व ध्वनी प्रदूषण होत आहे परिणामी येथील नागरिकांच्या शांतते जगण्याच्या हक्काला बाधा पोहोचत आहे. या चालणाऱ्या कर्कश आवाजामुळे ते त्रस्त झाले आहेत. पालिका व तत्संबंधित कार्यालयाकडून आशा दुकानदारांना भर नागरी वस्तीत परवाना मिळतो कसा? असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहेत.
अनेक वेळेस तक्रार करूनही या दुकानदाराला विरोधात कोणीही कारवाई करण्यास धजत नाही त्यामुळे आमच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो. याबाबतची काळजी प्रशासनाने घ्यावी अशा प्रकारचे निवेदन संबंधितांना देण्यात आले आहे. यावर प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply