गजानन कोटावार यांच्यातर्फे 3000 मास्क तर विनोद वट्टमवार यांच्यातर्फे 2000 हॅन्ड ग्लोज कोविड सेंटर, उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे वाटप

किनवट प्रतिनिधी: किनवटचे भूमिपुत्र असलेले गजानन आनंदरावजी कोटावार यांच्यातर्फे 3000 मास्क चे तर गिरीराज ट्रेडिंग कंपनी चे मालक विनोद वट्टमवार यांच्यातर्फे 2000 हॅन्ड ग्लोज कोविड सेंटर व उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे देण्यात आले.
गजानन आनंदरावजी कोटावार गेल्या 25 वर्षा पूर्वी व्यवसाय करण्यासाठी नागपूरला स्थायिक झाले आणि पाहता पाहता ते एक उंच शिखर ते गाठत गेले . आज प्रसिद्ध उद्योगपती मधे त्यांचे नाव नागपूर शहरात येते त्याचप्रमाणे त्यांना युवा यशस्वी उद्योगपती म्हणून त्यांना अवार्ड पण भेटला आहे.

आज नागपूर शहरात आर्य वैश्य समाज तर्फे विविध सामाजिक उपक्रम चालतात त्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा असतो, जरी ते पंचवीस वर्षापूर्वी नागपूरला स्थायिक झाले असले तरी किनवटचे नाळ त्यांनी सोडली नाही . किनवट शहरा सोबत त्यांचे एकदम जीवाभावाचे नाते जोडलेले आहेत त्याच अनुषंगाने त्यांना काही माहिती मिळाली की शहरात कोविड सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे काही वस्तू ची गरज भासत आहे त्यांनी तात्काळ उपनगराध्यक्ष अजय चाडावर यांच्याशी संपर्क साधून याची माहिती घेतली. लगेच त्यांनी सांगितले 3000 मास्क पाठवले. तसेच अजून काही लागत असल्यास पुन्हा देण्याचे असे आश्वासन दिले, आज त्यांनी N95 आणि सर्जिकल मास्क त्यांनी पाठवले आहेत. तसेच किनवट शहरातील कृषी क्षेत्रातील अग्रेसर नाव गिरीराज ट्रेडिंग कंपनी चे मालक विनोद वट्टमवार यांच्यातर्फे 2000 हॅन्ड ग्लोज कोविड सेंटर व उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे देण्यात आले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.