kinwat today news

चार महिन्यापासून किनवट शहरासह तालुक्यात निराधार लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे हजारो लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ

किनवट/प्रतिनिधी- कोरोना महामारी मुळे देशात लॉकडाउन करण्यात आल्याने गोरगरिबांना हाताला कामही नाही अशा परिस्थितीत किनवट शहरासह तालुक्यातील राज्य शासनाकडून मिळत असलेल्या संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेअंतर्गत अर्थसहाय्य चार महिन्यापासून मिळत नसल्याने हजारो लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली असून प्रलंबित अर्थसहाय्य तात्काळ वाटप करून न्याय देण्याची मागणी येथील कर्तव्यदक्ष नगरसेविका अनिता शिवा क्यातमवार यांनी तहसीलदारांसह संबंधित वरिष्ठांकडे केली आहे.
केंद्र शासनाकडून मागेल त्याला मोफत तांदूळ मिळत असला तरी राज्य शासनाकडून लॉकडाउन काळामध्ये कसल्याही स्वरूपाची सहाय्यता करण्यात आले नाही. याउलट राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना किनवट शहरासह तालुक्यात या योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिमहा त्यांच्या बँक खात्यात अर्थसहाय्य देण्यात येते होते. मागील चार महिन्यापासून किनवट शहरासह तालुक्यात निराधार लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे हजारो लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे आरोप करत सदर योजनेतील लाभार्थी हे वयोवृद्ध आहेत तर बहुतांश लाभार्थी अशिक्षित व दिव्यांग असल्यामुळे ते शासना कडून मिळत असलेल्या अर्थसहाय्यसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करू शकत नाहीत.
मागील काळात आयसीआयसीआय बँकेमार्फत निराधारांचे अर्थसहाय्य देण्यात येत होते. मात्र या बँकेतील प्रतिनिधीकडून लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात प्रचंड अनियमितता होत असल्याचे अनेक प्रकरणे उघड झाल्याने शासनाने आता लाभार्थ्यांच्या पोस्ट खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहे.मागील सहा महिन्यापासून देशात लॉकडाऊन सुरू आहे अशा परिस्थितीत निराधारांच्या हाताला काम मिळणे अवघड बनले असून शासनाकडून मिळणारे अर्थसाह्य देखील रखडत असल्याने निराधार लाभार्थ्यांचे जीवन जगणे कठीण बनले आहे. यामुळे सदर लाभार्थ्यांच्या चार महिन्याचे थकित अर्थसहाय्य तात्काळ जमा करून न्याय देण्याची मागणी चे निवेदन येथील प्रभाग क्र. ३ चे कर्तव्यदक्ष नगरसेविका अनिता शिवा क्यातमवार यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली असून स्थानिक प्रशासन यावर काय? कार्यवाही करेल याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागून आहे

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply