kinwat today news

किनवट येथे गजानन आगरमोरे यांच्या घरी चोरी; 52 हजाराचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

किनवट: घर मालक बाहेरगावी गेल्याची संधी साधून सुभाषनगर भागातील घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 52 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला ही चोरीची घटना गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी मध्यरात्री नंतर घडली असून किनवट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सुभाष नगर भागात राहणारे एलआयसी एजंट गजानन हरिभाऊ आगरमोरे वय 35 वर्षे सहकुटुंब आपल्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी बाहेर गावी गेले होते ही संधी साधून गुरुवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी लोखंडी रॉड च्या साह्याने दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला घरातील लोखंडी कपाट फोडून त्याच्या लॉकर मधील नगदी रक्कम असलेले प्लास्टिक गल्ले व सोन्याचे दागिने असा एकूण 52 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला . घर मालक आगरमोरे घरी परतल्यानंतर त्यांना चोरीची घटना समजली व त्यांनी किनवट पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्यावरून चोरट्याविरुद्ध कलम457, 380 भादवि अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांच्या मार्गदर्शना खाली एपीआय विजयकुमार कांबळे हे तपास करीत आहेत.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply