kinwat today news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवासा निमित्त किनवट भा.ज.पा.कडुन १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर “सेवा सप्ताह” साजरा

किनवट( ता.प्र ) देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्या वाढदिवासानिमित्त भारतीय जनता पार्टी कडुन संपुर्ण देशात दिनांक १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर “सेवा सप्ताह” साजरा करण्यात येत आहे, त्याचे औचित्य साधुन भाजपा किनवट कडुन मागील १४ सप्टेंबर पासुन विविध उपक्रम राबवले जात आहे त्याच अनुषंगाने आज शहरातील बस स्थानक परिसरात स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली यावेळी भाजपांच्या पदाधिका-यांनी आ.भिमराव केराम यांच्या उपस्थितीत बस स्थानक परिसराची स्वच्छता केली.
       भाजपा कडुन नियोजित “सेवा सप्ताह” मध्ये यापुर्वी भाजपा किनवट कडुन गोकुंदा येथिल कोविड केअर सेंटर व बोधडी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना फळ वाटप करण्यात आले तसेच मतदारसंघातील बोधडी व जलधारा येथे वृक्षारोपन करण्यात आले अशी माहीती शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार यांनी दिली. आज आ.भिमराव केराम यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले त्यावेळी संबोधित करतांना आ.भिमराव केराम यांनी सांगितले की देशाचे सर्वाधिक लोकप्रित पंतप्रधान हे एक त्याग मुर्ती असुन त्यांच्या त्यागामुळे आज भाजपा हा जगातील सर्वाधिक पदाधिकारी व कार्यकर्त्ये असलेला लोकप्रिय पक्ष बनला आहे व देशाला स्थिर सरकार मिळाले आहे यासोबतच देशाची धोरणं व निर्णय घेण्याची क्षमता हि कणखर झाली आहे त्यामुळे आंतराष्ट्रीय पातळीवर देशाची भुमिका स्पष्ट व कणखर अशी मांडण्यात येत आहे येत्या काळात अनेक कल्याणकारी योजना ह्या देशाच्या गोरगरीब जनते करिता ते सुरु करतील त्यांना उत्तमोत्तम आरोग्य लाभो हिच मनोभावे कामना त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली.
       यावेळी ओ.बि.सी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाबु केंद्रे, भाजपा नेते अनिल तिरमनवार, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, ता.अध्यक्ष संदिप केंद्रे, युवा मोर्चाचे संतोष चनमनवार, मुंबई येथिल उद्योजग मुस्ताक भाऊ, दत्ता आडे, कपिल करेवाड, सतिष नेम्मानिवार, सतिष बिराजदार, शिवा क्यातमवार, प्रेमदास मेश्राम, नगरसिंग तक्कालावार, राजेंद्र भातनासे, स्वागत आयनेनिवार, विजय कन्नेलवार, आगार प्रमुख मिलिंदकुमार सोनोले, विनोद नेम्मानिवार, राजु येंड्रलवार, विजय दार्लावार, गजु दासरवार, स्वच्छता कर्मचारी सुरेश ढंडोरे, शेख अयुब्ब यांच्या सह अनेक भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते तर नागरीकांनी या मोहिमेस प्रतिसाद दिला.
       

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply