kinwat today news

चिखली (बु.)हुडी येथील प्रस्तावित साठवण तलावाला मंजुरी देऊन तलावाची निर्मिती करण्यासाठीची केली बालाजी बामणे यांनी केली जलसंपदा मंत्री जयंत पाटलाकडे केली मागणी.

किनवट /(आनंद भालेराव): तीस वर्षापूर्वी तालुक्यातील मौजे चिखली (बुद्रुक) घोटी या ठिकाणी शासनाने पाटबंधारे विभागामार्फत साठवण तलावाच्या प्रस्तावाला मंजुरी देऊनही अद्याप तलाव निर्मितीचे काम हाती घेतले नसून सदर तलावाच्या क्षेत्रात पंचवीस ते तीस गावे शेती क्षेत्र सिंचनाखाली येत असून पाण्याचा प्रश्न व सिंचन शेतीचा प्रश्‍न सोडवण्यासाठी मंत्रीमहोदयांनी तात्काळ रेंगाळत पडलेला शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याची व पोट खिडकीची मागणीकडे लक्ष देऊन तात्काळ काम चालू करावे. अशा आशयाचे निवेदन किनवट/माहूर तालुक्याचे सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वजनदार युवा नेतृत्व बालाजी गोविंदराव बामणे यांनी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा प्रदेश अध्यक्ष नामदार जयंत पाटील यांना 15 सप्टेंबर रोजी मुंबई येथे प्रत्यक्ष भेटून दिले. त्यामुळे परिसरात शेतकऱ्यांमध्ये आनंद व समाधान व्यक्त करीत आशा पल्लवित झाल्या आहेत.
सविस्तर वृत्त असे की नांदेड जिल्ह्यातील किनवट हा तालुका अतिदुर्गम मागास व नक्षलग्रस्त तालुका म्हणून परिचित आहे या तालुक्यातील मौजे चिखली (बुद्रुक) हुळी हा परिसर सुपीक शेतजमिनीचा असला तरी पाण्याअभावी शेतकऱ्यांना निसर्गावरच अवलंबून राहावे लागते केवळ एकच रब्बी हंगामाचे उत्पन्न घेतात ते ही निसर्गावर अवलंबून राहावे लागते. सदर ठिकाणच्या तलावाची निर्मिती झाल्यास अंदाजे 30 ते 35 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आणि हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊन शेतकऱ्यांची आर्थिक मानसिक बदल घडून परिसर सुजलाम, सुफलाम होणार सदर साठवण तलावाची निर्मिती झाली. तर चिखली (बुद्रुक) या गावासह परिसरातील बुधवार पेठ, मलकवाडी चिखली (बुद्रुक) आंदबोरी, दाभाडी दर सांगवी, दुधगाव, शनिवार पेठ, आंमडी, बेंडी तांडा, मदनापूर, प्रधान सांगवी बोधडी खुर्द, पार्डी, कोपरा, दाभाडी, कोठारी, चिखली, गोकुंदा, दहेगाव आंदबोरी सहित अशा पंचवीस ते तीस गावातील हजारो हेक्टर शेतजमिनी सिंचन क्षेत्र खाली येतील आणि शेतकऱ्यांबरोबर मजुरांचा ही प्रश्न सुटेल त्यांच्याही हाताला काम मिळेल त्यासाठी माननीय मंत्री महोदय साहेबांनी आमचे नेते माजी आमदार प्रदीप नाईक यांचा शब्द मिळून हजारो शेतकर्‍यांच्या वतीने व किनवट माहूर युवक राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे देत असलेले निवेदनाची सहानुभूतीने विचार करून या साठवण तलावाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावून आम्हाला न्याय द्यावा. रा.काँ.चे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुबभाई शेख व जिल्हा कार्याध्यक्ष नांदेड सचिन जाधव, मागणी युवकांचे एक तडफदार नेतृत्व बालाजी बामणे व बंटी पाटील आशिष राठोड, दिनेश इंगळे यांच्यावतीने जलसंपदामंत्री जयंत पाटलाकडे केली आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply