निवेदन देउन मराठा आरक्षण देण्याची पुन्हा मागणी

किनवट: (ता.प्र.) मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाज मोठ्या प्रमाणात राज्यभर महामोर्चा काढुन आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा केला होता.राज्यभरातील सर्व जिल्ह्यात एक मराठा लाख मराठा म्हणुन मराठा समाज रस्यावर उतरला काहींनी प्राणाची आहुती दिली .याचीच नोंद घेत मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला होता. शासनाच्या हलगर्जीपणामुळे उच्चन्यायालय शासनाने भक्कम बाजु मांडण्यास शासन असमर्थ ठरले. त्यामुळे न्यायालयाने मराठा आरक्षणा वर स्थगीती दिली .शासनाच्या लापरवाहीमुळे मराठा आरक्षणावर न्यायालयाने स्थगीती दिली. त्यामुळे संभाजी ब्रिगेड यांनी  निवेदनाद्वारेसहाय्यक जिल्हाधिकारी यांना अजय कदम पाटील तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांनी शासनाच्या हलगर्जी पणामुळे न्यायालयात आरक्षण टिकले नाही .म्हणुन शासनास निवेदन देण्यात आले .यावेळी सभाजी ब्रिगेडचे शिवा सोंळके ,अमर सुरोशे ,अविनाश शिंदे,अतुल खरे,सुरज चव्हान,शिवा पवार,सुरेश जाधव,अक्षय सोंळके,कृष्णा माजलकर,यांनी प्रशासनाला निवेदन देउन मराठा आरक्षण देण्याची पुन्हा मागणी केली. अन्यथा येणार्‍या काळात लोकशाही व सनदशिर मार्गाने महाराष्ट्रभर आरक्षण मिळेपर्यन्त आंदोलन छेडण्याचा ईशारा संभाजी ब्रिगेड ने या वेळी निवेदना व्दारे देण्यात आला आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.