kinwat today news

इस्लापूर येथे प्रहार दिव्यांग क्रांति संघटनेची बैठक

इस्लापुर/प्रतिनिधी : आज दिनांक 14/9/2020 रोज सोमवारी सकाळी ठिक 11 वाजता इस्लापूर येथे प्रहार दिव्यांग क्रांति संघटनेची बैठक घेण्यात आली. या बैठकीचे अध्यक्ष इस्लापूर ग्रामपंचायत चे सरपंच देवीदास पळसपूरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ता .अध्यक्ष भगवान मारपवार व ता.कोषाध्यक्ष शेख फेरोज. अब्दुल सलीम हे होते.
या बैठकीत तालुका संपर्क प्रमुख म्हणून दिनेश जैस्वाल , ता.उपाध्यक्ष दशरथ चव्हाण, इस्लापूर सर्कल प्रमुख खंडू हाडे, जलधरा सर्कल प्रमुख दशरथ अंबेकर ,शिवणी सर्कल प्रमुख बाळु आडे ,बोधडी सर्कल प्रमुख गोविंद वाकोडे यांची एकमताने निवड करण्यात आली. या बैठकीत गिरीधारी पवार, प्रकाश आडे,निरंजन राठोड विनोद वाठोरे, रूखाजी लाखाडे यांच्यासह अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते. या कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply