kinwat today news

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक झाकल्या जात आहे.नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष.

किनवट/आकाश बोलेनवार: किनवट येथील अण्णा भाऊ साठे पुतळा जवळ अतिक्रमण खूप झालेला आहे त्यामुळे पुतळा दिसेनासा झालं आहे या वर्षी सुवर्णजयंती असून ही अण्णा भाऊ आज पण उपेक्षितच आहे….
प्रत्येक वर्षी अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निम्मित सर्व नेते मंडळी येतात आणिआश्वासन देऊन जातात परंतु आज पर्यंत कोणत्याही नेत्याने अण्णा भाऊ साठे पुतळा सुशोभीकर करण्यासाठी पाऊले उचलेले नाही…


किनवट शहरातील बस स्टँड जवळ असलेल्या साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे चौक आता दिसेनासा झालेल्या आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या चौका समोर गाड्या व मोठी वाहने लावण्यात येत आहेत. तसेच या चौका समोरच भाजीपालामार्केट, खुर्ची वाले व इतर सामान विक्रीसाठी बसलेली आहेत या सर्व कारणांमुळे किनवट शहरातील अण्णाभाऊ साठे चौक आता दिसेनासा झाला आहे. येआजादी झुठी है। देश कि जनता भुकी है। हअसा नारा देणारे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे कार्य व त्यांचे महाराष्ट्रासाठी चे योगदान सर्वांनाच माहित आहे. पोवाडे, लावण्या, गीत, पद ,नाटके, कादंबऱ्या, छक्कड या सर्व काव्य प्रकाराचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचाराच्या प्रचारासाठी वापर केला.
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांची जनजागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून च्या माध्यमातुन योगदान दिले आहे. अशा या महापुरुषाचे नाव ज्या चौकाला आहे त्यात चौकांमध्ये व त्यांच्या पुतळ्याच्या समोर दुकाने लावून चौक झाकण्याचा प्रकार होत आहे. म्हणजेच पुतळा दिसेनासा होत आहे. त्यामुळे एकप्रकारे त्या महापुरुषाचा अवमानच होत आहे. हे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्या लक्षात येत नाही का ? असा सवाल निर्माण होत आहे . या महापुरुषाच्या पुतळ्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपालिकेने विशेष पुढाकार घ्यावा व परिसर सुंदर व स्वच्छ ठेवावा अशी समाजातून अपेक्षा व्यक्त होत आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply