kinwat today news

किनवट तालुका शिवसेनेचे समन्वयक मारुती दिवसे नी 2003 पासून सतत 55 वेळेस केले रक्तदान

बेल्लोरी धानोरा( प्रतिनिधी)_रक्तदान हे अमूल्य दान रक्तदानामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो हा उदात्त हेतू ठेवून किनवट तालुका  शिवसेनेचे समन्वयक मारुती दिवसे 2003 पासून सतत रक्तदान करीत असताना आज दि 7 /9/2020 रोजी अंजनखेड येथील नांदेड जिल्हा शिवसेनेचे उपप्रमुख  जोतिबा खराटे दादा यांच्या वाढदिवसानिमित्त 55 व्या वेळेस  रक्तदान करण्याचा योग्य  आला  आज पर्यंत कुठल्याही अपेक्षेने व कोणत्याही पुरस्कार मिळावा या हेतूने हे रक्तदान करीत नसून फक्त आपण केलेल्या रक्तदाना ने एखाद्याचे प्राण वाचतील ह्या उद्देशाने सतत वर्षातून 2ते 3 वेळा शिवसेनेचे मारोती दिवसे हे करीत असतात. त्यांच्या जनसामान्यांच्या व गरजू रुग्णासाठी उपयोगी पडणाऱ्या बहुमूल्य अशा रक्तदानामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply