kinwat today news

गोकुंदा व किनवट तालुक्यातील कोविड विषयक समस्या राज्याचे मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांच्या समोर मांडणार – प्रकाश राठोड, तालुका अध्यक्ष रा.काँ.किनवट

किनवट ता.प्र दि ९ कोरोना विषाणु संक्रमीत रुग्ण वाढत असतांना गोकुंदा येथिल उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटर मध्ये रुग्णांना असुविधाचां सामना करावा लागत आहे त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दुर्लक्ष केल्याने किनवट येथिल आरोग्य यंत्रणेवर कोणाचेही नियंत्रण नाही असे निदर्शनास येत आहे त्यामुळे गोकुंदा येथिल कोविड सेंटर मध्ये दर्जेदार अन्न, औषधी व तज्ञ डॉक्टर पुरवठा करा अन्यथा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षा तर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा रा.कॉ चे ता.अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांनी दिला आहे.
      स्थानिक लोकप्रतिनिधी नी केलेल्या दुर्लक्षामुळे उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर मध्ये नागरीकांना अनंत समस्यांना समोरे जावे लागत आहे यात प्रामुख्याने उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर मध्ये कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना मिळणारे जेवन हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे असे ही राठोड यांनी सांगितले आहे तर नागरीक रुग्णालयात गेल्यावर कोरोना चाचणी करण्याच्या वेळा, कोरोना चाचणी कुठे होणार ? रुग्णालयात कोणते विभाग कोठे आहे ह्या बाबी कळण्याकरिता कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फकल लावण्यात आलेले नाही यामुळे देखिल या कोरोना आजारात नागरीकांची हेळसांड होत आहे तर रुग्णालयातील कोणताही कर्मचारी सहकार्याच्या भावनेने काम करत नाही.
      उपजिल्हा रुग्णालयात साधे व्हिलचेअर नाही यामुळे हृद्यविकार असो अथवा इतर कोणतेही आजार रुग्णाला नातेवाईकाच्या खांद्याचा आधार घेऊनच फरफटत दाखल व्हावे लागते यामुळे एखाद्यावेळी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
      यासोबतच या सेंटर मध्ये दाखल पॉझिटीव्ह रुग्णांना Ivermectin सारख्या औषध उपल्बध करुन देण्यात येत नाही जे कि आय.सी.एम.आर सारख्या संस्थेने सुचवले आहे व काही अत्यवस्त रुग्णांना toshi and ramdtion इंजेक्शन लागते त्याची किंमत खुप जास्त असते ते गोर गरीबांना विकत घेणे परवडत नाही अशा स्थितीत ह्या सर्व बाबीवर नियंत्रन ठेवणे हे स्थानिक जनप्रतिनिधीचे काम आहे परंतु कोरोना काळा पासुन त्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केले आहे असे ही राठोड यांनी सांगितले तर बेड ची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी मी निवेदनाव्दारे दोन महिण्यापुर्वीच केली होती त्या बद्दल कोणत्याही स्वरुपाची कारवाई केली नाही तर दुर्लक्ष करण्यात आले यामुळे आजच्या स्थितीत बेड उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना नांदेड, आदिलाबाद, हैद्राबाद या ठीकाणी जावे लागत आहे. तरी नांदेड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी देखिल किनवट माहुर भागाकडे लक्ष द्यावे त्यांनी किनवट बद्दल ची सापत्न वागणुक ही काय नविन नाही परंतु कोरोना सारख्या काळात तरी माणुसकीच्या नात्यांने पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी किनवट माहुर तालुक्यातील आरोग्य विषयक समस्या सोडवाव्यात.
      किनवट येथुन एखादा रुग्ण नांदेड येथे रेफर केल्या नंतर त्यास नांदेड येथे अनेक किचकट अडचणींचा सामना करावा लागतो व तिथे रुग्णाला घेत नाहीत यामुळे नागरीकांना अनंत त्रास होत आहे यासर्व बाबी घेऊन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे ता.अध्यक्ष प्रकाश राठोड हे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे जाणार असल्याचे ही सांगितले आहे. 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply