kinwat today news

जिल्हा परिषद प्रा.शाळा दिगडी (मं) चा कौतुकास्पद उपक्रम; शिक्षकांनी भिंती केल्या बोलक्या.

किनवट (प्रतिनिधी): सध्या संपूर्ण जगात कोरोना या महामारीने जगात थैमान घातले असता शिक्षण विभागाने शाळा बंद शिक्षण सुरू हा ऑनलाईन उपक्रम सुरू केला. परंतु आजही ग्रामीण भागात बऱ्याच पालकांकडे स्मार्टफोन नाही, ज्यांच्याकडे आहे तिथे नेटवर्कची अडचण आहे.या सर्व अडचणीवर मात करून जि.प.प्रा. शाळा, केंद्र-मांडवा येथील उपक्रमशील शिक्षक प्रसन्न धात्रक यांनी गृह भेट देऊन विद्यार्थ्यांना घराच्या बाहेर त्यांच्या सोयीनुसार भिंतीवर, तर कुठे रिकाम्या पत्रावर अक्षर, संख्या, शब्द व इंग्रजी मुळाक्षरे देऊन विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेत आहेत.

विद्यार्थ्यांना मंदिराच्या पारावर बोलवून मास्क व सामाजिक आंतर याचे पालन करत त्यांनी स्वतः रेखाटन करून विद्यार्थ्यांना अभ्यास दिला. मुले आनंदाने जाऊन शिकत आहेत. मुलांसाठी हा उपक्रम स्तुत्य आहे.या कार्यात सहशिक्षक संदीप इंगोले यांनीही सहभाग घेतला असून गावकऱ्यांनी दोन्ही शिक्षकांचे कौतुक केले.त्याच बरोबर शिक्षकांनी स्वखर्चातून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना उजळणी पुस्तक वाटप केले.भिंती ते शाळा हा उपक्रम राबवून दुर्लक्षित भिंती, पत्र्याचे तसेच निरुपयोगी बॅनर याचा उपयोग लिहिण्यासाठी सुंदर प्रकारे केला.

केंद्रीय मुख्याध्यापक गोवर्धन मुंडे, केंद्रप्रमुख भघनारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. सदर उपक्रमाबद्दल गटशिक्षणाधिकारी अनिल कुमार महामुने ,शिक्षण विस्ताराधिकारी नाना पांचाळ, तसेच गावातील सरपंच व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply