kinwat today news

किनवट कोविड सेंटर मध्ये दोन शिक्षक उपचार घेत असून त्यांच्या व्हायरल झालेल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया.

किनवट प्रतिनिधी: किनवट येथे नवीन तहसील कार्यालय व गोकुदा उपजिल्हारुग्णालय येथे असे दोन कोविड सेंटर असून या कोविड सेंटर मध्ये दोन शिक्षक उपचार घेत असून त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत ते अशा-

*पहिली प्रतिक्रिया-

मी विजय वेंकटराव सातुरवार सह शिक्षक स. वि. मं. प्रा. शाळा kinwat मला दिनांक 29 ऑगस्ट ल कोरोना टेस्ट positive निघाल मी त्या दिवसा पासून तहसील ऑफिस kinwat covid center la उपचार घेत आहे आज मला इथे येऊन 9 days झाले .माझी तब्येत एकदम मस्त आहे आणि त्याच कारण म्हणजे येथील वातावरण नियोजन आणि व्यवस्थापन .🙏
आत्यांत व्यवस्थित नियोजन आहे प्रत्येक गोष्टीत इथे बारकाईने लक्ष दिल्या जाते .
सकाळी चहा (उत्तम) नंतर लगेच नाष्टा व पुन्हा सर्व रुग्णांची तपासणी करून १२ वाजता जेवण . सर्व परिसराची साफ सफाई रोज बाथरूम ची सफाई. मिनरल पाण्याची उत्तम व्यवस्था . दुपारी पुन्हा चहा आणि रात्री 8.30 वाजता पुन्हा संध्याकाळ च जेवण प्रत्येक गोष्ट time to time आणि उत्तम ….
मी हा मेसेज लिहिण्याच कारण की आपण कोणी ही जे Corona positive निघाले किंव्हा कोणाचे relative positive असतील तर त्यांना घाबरून जाऊ न देता किंव्हा तुम्ही गोंधळून न जाता बिलकुल चिंता न करता राहू शकता कारण माझ्या स्वतः च्य अनुभवातून सांगत आहे की kinwat covid center आपली उत्तम प्रकारे काळजी घेण्यास सक्षम आहे .
उद्यामला इथून डिस्चार्ज मिळत आहे आणि मी व माझ्या सोबत माझे काका आणि आमचे शेजारी प्रमोद स्वामी आम्ही तिघे जन बिलकुल सुदृढ आणि आनंदी वातावरण इथून निरोप घेत आहोत
मी सर्व प्रथम covid center चे इन्चार्ज वाघमारे मॅडम त्यांचे व त्यांची सर्व टीम नर्सेस . कमपौंडर. नगर पालिकेतील सफाई कर्मचारी तसेच इथे सर्व सुविधा पुरविणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला धन्यवाद करू इच्छितो ….
तसेच सगळ्यात महत्वाचे आणि आपल्या सगळ्यांचे लाडके नगर अध्यक्ष साहेब आनंद भाऊ जे प्रत्येक क्षणी आपल्या सगळ्या सोबत खंबीर पणे उभे आहेत प्रत्येक कामात एक क्षणात उपस्थित असतात.एक त्यांचं उदाहरण म्हणजे पर्वा 4 सप्टेंबर. ल दुपारी 3 पासून covid center la light नव्हती आणि 7 वाजे पर्यंत इन्व्हर्टर वेवस्था असल्या मुळे आमच्या लक्षात सुधा आल नाही की लाईट नाही म्हणून जेंव्हा पाणी संपलं तेंव्हा लाईट नाही ही बाब आमच्या लक्षात येताच दादा ल call Kela आणि फक्त म्हटलो की दादा इथे लाईट गेली .ते स्वतः mseb linemen la घेऊन एक 10 मिन इथे उपस्थित झाले आणि अवघ्या 15 मिनटात लाईट ची व्यवस्था करून दिली ही त्यांची तत्परता …..🙏🙏
पुन्हा एकदा सर्व covid center kinwat chya team चे खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏
आपला
Saturwar vijay venkatrao
Asst. Teacher s.v.m.pri.school kinwat
9850084552

*दुसरी प्रतिक्रिया-

दुर्लक्षित कोविड सेंटर ………
किनवट तहसील / गोकुंदा
मी दिनांक 29 /8 /2020रोजी तपासणी केली असता माझी टेस्ट पॉझिटिव्ह निघाली आहे. पहिल्यांदा मला किनवट तहसील कोविड सेंटर येथे ठेवण्यात आले मी त्यांना विचारले की मला किनवट सेंटरला का ठेवता गोकुंद्याला का नाही मला उत्तर मिळाले की
ज्याला जास्त त्रास त्याला गोकुंदा व इतरांना किनवट ला
किनवट कोविड सेंटर…….
१)आंघोळीची सोय नाही
२)बकीट नाही ही इतर साहित्य नाही
३)ऑक्सिजन मोजण्यासाठी ऑक्सी मीटर नाही का नाही असे विचारले असता खराब झाले आहे असे उत्तर मिळाले
४)रुग्णांना इतर काही आजार असल्यास त्याची ट्रीटमेंट करण्याची ची सोय नाही
५)रूम मध्ये खूप मच्छर आहेत
६)सफाई कामगार फक्त बाहेरूनच सफाई करतात रूम मध्ये येऊन सफाई करत नाहीत

किनवट कोविड सेंटर तसेच गोकुंदा कोविड सेंटर येथे रुग्णांना इतर आजार असल्यास त्याची तपासणी करण्याची सोय असावी जसे की छातीचा एक्स-रे, सीबीसी, व इतर रक्त तपासण्या……

गोकुंदा कोविड सेंटर येथे डॉक्टर गोणेवार व व डॉक्टर गुंटापेल्लीवार यांचे सहकार्य लाभले….
परंतु दोन्ही कोविड सेंटरमध्ये स्वच्छतेचा खूपच अभाव दिसून आला
दोन्ही कोविड सेंटर मध्ये डॉक्टर तसेच नर्स सुद्धा पेशंट कडे जास्त वेळ देत नाहीत…..

किनवट तालुक्यातील नेते, समाजसेवक,पत्रकार सर्वांना विनंती की आपण सर्वांनी पी पी इ किट घालून किनवट मधील दोन्हीही पॉझिटिव्ह कोविड केअर सेंटरला अचानक पणे भेट देऊन माझ्या या पत्राची शहानिशा करावी सत्य आपल्याला लगेच कळेल……

असे लिहिण्याचे कारण की
१)दहा दिवस आंघोळ केली नाही तर काय होईल………..
२)रूम मध्ये स्वच्छता नसेल तर………….
३)रूम मध्ये खूप मच्छर असतील तर…….

४)पॉझिटिव्ह रुग्णांची रक्त तपासणी केली नाही तर त्यांना इतर आजार बळवण्याची दाट शक्यता असते ५)छातीचा एक्स-रे काढला नाही तर फुफुसावरील इंफेक्शन कळणार नाही
६)रुग्णांना दररोज अंडे खायला द्यायला पाहिजे
७)रुग्णांचे दररोज ऑक्सिजन तपासायला पाहिजे यासाठी ऑक्सी मिटर किनवट कोविड सेंटरला असावे ज्याची किंमत 450 ते 1000 रु आहे………
मला कोणाचीही तक्रार करायची नाही परंतु वस्तुस्थिती सर्वांसमोर मांडायचे आहे
भारतीय नागरिक ॲडजस्ट करून घेण्यात खूप माहीर आहे, अशा ऍडजेस्ट करणाऱ्या सर्व नागरिकांना माझा प्रणाम
🙏 नमस्कार 🙏
रवी गोपाळराव नेम्मानिवार
(पॉझिटिव्ह रुग्ण)
जिल्हा परिषद शिक्षक ता. किनवट
9822343722

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply