kinwat today news

लोकसंख्येवरआधारितआरक्षण द्या:- संभाजी ब्रिगेड

किनवट (तालुका प्रतिनिधी) पावसाळी अधिवेशनात ओबीसी समाजाच्या मागण्या लावून धरण्याबाबत आज.दि.4-9-2020 रोजी संभाजी ब्रिगेड किनवट शाखेच्या वतीने मा.आ.भीमराव केराम साहेब यांना निवेदन देण्यात आले… सदर निवेदनात दिनांक 2/9/ 2020 च्या म्हणजे माननीय मुख्यमंत्री साहेब यांना जिल्हाधिकारी कार्यालया नांदेड मार्फत पाठविलेल्या निवेदनाची ही प्रत दिली आहे, या निवेदनात प्रमुख्याने, 1) महाराष्ट्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वयम् व आधार योजनेच्या धर्तीवर वार्षिक 40 हजार रुपये विद्यावेतन सुरू करावे. 2) राज्य सरकारच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा शुल्क फक्त शंभर रुपये म्हणजे शंभर रुपयापेक्षा जास्त नसावे. आदी मागण्यांसह केंद्र सरकारच्या पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी प्रामुख्याने, ) 2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसीं सह सर्व समाजाची जातिनिहाय जनगणना करावी. तसेच 2)आरक्षणाची मर्यादा वाढवून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे. आदी मागण्याचे पत्र किनवट /माहूर तालुक्याचे आमदार भीमराव केराम यांना “आपल्या मतदारसंघातील ओबीसी समाजाचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या विधिमंडळात कार्य करीत आहात. सध्या ओबीसी समाज विविध समस्यांनी ग्रस्त आहे.यातून ओबीसी समाजाला बाहेर काढण्यासाठी दिनांक 2/09/ 2020 रोजी सोबत जोडलेला प्रस्ताव व मागण्या पाठवल्या आहे. पावसाळी अधिवेशनात सदर प्रकरणी चर्चा घडवून आणली जावी व ओबीसी समाजाचे प्रश्न मार्गी लावावे. म्हणून आपण आग्रही भूमिका घ्यावी. अधिवेशनाचा कालावधी कमी असल्याचे कारण पुढे न करता कालावधी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे अशी आम्ही ओबीसी समाजाच्या वतीने विनंती करीत आहोत.”
मा.आ.भीमराव केराम साहेब यांना . दिलेल्या निवेदनावर शिवश्री बालाजी पाटील शिरसाट संभाजी ब्रिगेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नांदेड, शिवश्री सचिन पाटील तालुका अध्यक्ष किनवट, शिवश्री विशाल पाटील शिंदे तालुका अध्यक्ष माहूर यांच्या सह्या आहेत.
“जिसकी जितनी साधी दारी उसकी उतनी भागीदारी”
या प्रचलित सर्वसामान्य सर्वमान्य उक्तीप्रमाणे आता संभाजी ब्रिगेड ने ही मागणी लावून धरली आहे तरी समाजातील इतर सर्व दबाव गटानी, बलशाली संघटनांनी लोकप्रतिनिधीने व प्रशासनाने दखल घेतल्यास सदर मागण्या तर मान्य होतीलच परंतु देश एक महान ‘महासत्ता’ कडे वाटचाल करेल हे मात्र खरे आहे असे सर्वसामान्य जनतेतून बोलल्या जात आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply