नांदेड :- ( मारोती शिकारे ) आज नांदेड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे की दि 2/9/2020 रोजी दैनिक साहित्य सम्राट वर्तमानपत्र मुख्य कार्यालयात जाऊन मुख्य संपादक पंडिरावजी हाणमंते यांच्या वर जबर प्राणघातक हल्ला करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे . या बद्दल चे तक्रारी अर्ज वरुन गुंड व्यक्ती बळीराम रामा कांबळे या आरोपी विरोधात गांधी चौक लातूर पोलीस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायदा 2017/3 प्रमाणे व भादवी कलम 323,506,504, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या गुंड आरोपी व्यक्ती बळीराम रामा कांबळे यास तात्काळ आटक करुन संपादक पंडितरावजी हाणमंते यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे असे मागणी चे निवेदनात म्हटले आहे. व तसेच वरील आरोपीस तात्काळ आटक झाली नाही. किंवा संपादक यांना पोलिस संरक्षण न मिळाल्यास पत्रकारांच्या वतीने तिव्र स्वरूपाचे आंदोलने छेडण्याचा ईशारा पण देण्यात आले आहे .
या वेळी निवेदन देण्यासाठी दै माहिती चे संपादक विनायक कामठेकर ,दै साहित्य सम्राट चे विभागीय संपादक सुर्यकांत तादलापूरकर ,जिल्हा प्रतिनिधी मारोती शिकारे ,शंकरसिंह ठाकूर ,संजय गायकवाड ,गजेंद्रसिंह ठाकूर , प्रेमदास वळसंकर ,आकाश भालेराव ,निलेश तादलापुरकर, रवींद्र जोंधळे, प्रेमानंद जोंधळे, साहेबराव कोलंबीकर, समीर कोलंबीकर ईत्यादी उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.