kinwat today news

विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात यासाठी च्या आंदोलनास संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा

नांदेड: (बालाजी सिरसाट) विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात यासाठी शिक्षकांनी तर्फे आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते.त्यांना आज संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा देण्यात आला मागण्या मान्य नाही केल्यास येणार्‍या काळात विनाअनुदानित शिक्षकांसाठी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला.
या संदर्भात आज जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देण्यात आले.यावेळी उपस्थित
संकेत पाटील- लोकसभा अध्यक्ष,सुभाष कोल्हे – जिल्हाध्यक्ष उत्तर,भगवान कदम- जिल्हाध्यक्ष मध्य ,अविनाश शिंदे – जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर पाटील- जिल्हा कार्याध्यक्ष
मोहन शिंदे- तालूकाध्यक्ष उत्तर ,संतोष खानसोळे – तालुकाध्यक्ष मुदखेड आदी उपस्थित होते.

विनाअनुदानित शाळांच्या न्याय मागणीसाठी श्री गजानन खैरे सर यांच्या दि.27 जुलै 2020 पासून क्रांती चौक औरंगाबाद ते मुंबई मंत्रालय निघालेल्या अन्नत्याग पायी दिंडीस जाहीर पाठिंबा तसेच न्याय मागण्या त्वरित मान्य करण्यात यावे यासाठी नवयुवक क्रांती शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष श्री गजानन खैरे सर व त्यांच्या सहकारी यांनी 13 सप्टेंबर 2019 रोजी अनुदानास पात्र घोषित झालेल्या प्राथमिक व उच्च माध्यमिक व अंशतः वाढीव शाळा यांचा वाढीव टप्पा यांना मंजूर अनुदान प्रचलित नियमानुसार वितरण होणे तसेच अघोषित शाळा निधी सह घोषित होणे या मागणीसाठी तात्काळ पूर्णता होण्यासाठी तसेच होत असलेल्या विलंबनाच्या कारणाने दिनांक 27 जुलै 2020 पासून क्रांती चौक औरंगाबाद येथून मुंबई मंत्रालयापर्यंत अन्न त्याग दिंडी सुरू केली आहे.आजचा पायी दिंडीचा सोळावा दिवस आहे.खैरे सर यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.शासनाने त्यांना पोलिस संरक्षण सुद्धा दिलेले आहे.तरी येणार्‍या कॅबिनेट बैठकीत शासनाने त्वरित त्यांना न्याय देऊन विनाअनुदानित शिक्षकांच्या न्याय मागण्या मान्य कराव्या यासाठी या पायी दिंडीला संभाजी ब्रिगेड नांदेड जिल्ह्याच्या वतीने पाठिंबा देत आहोत.
तरी सदरील मागण्या तात्काळ मान्य कराव्या अन्याता संभाजी ब्रिगेड नांदेड च्या वतीने जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात असे मा.जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply