kinwat today news

आ. भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक संपन्न

किनवट:12ऑगस्ट (आनंद भालेराव)
येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे किनवट माहूर चे आमदार भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक पार पडली. याप्रसंगी तहसीलदार उत्तम कागणे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री मंदार नाईक, पोलीस निरीक्षक एमडी थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.


याप्रसंगी बोलताना आमदार भीमराव केराम म्हणाले की, सध्या जागतिक महामारी करोना 19 चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरत असून सध्या किनवट ची परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. या परिस्थितीतही आपण सर्वांनी शासनाच्या निर्देशाप्रमाणे नियम व अटी चे पालन करून स्वातंत्र्य दिन, गणपती उत्सव व पोळा उत्सव साजरा करावा. शासनाला कोणाचे म्हणे दुःख दुखवायची नाहीत परंतु सध्या जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी या परिस्थितीचे भान लक्षात ठेवून सोशल डिस्टंसिंग पाळत उत्सव आनंदाने साजरा करूया.

तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, तहसीलदार उत्तम कागणे पोलीस निरीक्षक मारुती थोरात,यांनी शांतता कमिटी बैठकीत पत्रकार व्यापारी व नागरिक यांना मार्गदर्शन केले.
सध्या विद्युत महामंडळाच्या अनागोंदी कारभाने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी आमदार भीमराव केराम यांनी किनवटचे अभियंता यांना तक्रार मोबाईल नंबर चालू ठेवण्याच्या सूचना केल्या. तसेच यापुढे विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या. किनवट शहरातील विद्युत पुरवठा करणारी लाईन हे अनेक वर्षापूर्वीचे असल्यामुळे तारा जिथे लोंबकळत आहेत असा प्रश्न विचारला असता आमदार केराम यांनी पुढच्या वर्षीच्या गणपती पर्यंत किनवट शहरातील विद्युत लाईन बदलून नवीन टाकण्याचा मनोदय व्यक्त केला. याचे सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
याप्रसंगी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माजी नगराध्यक्ष के मूर्ती, माजी नगराध्यक्ष तथा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिनकरराव चाडावार,अरुण आळणे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर उत्तम धुमाळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी निलेश सुंकावार, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेमानिवर, मारोती सुंकलवाड,साजिद खान,जहीर खान, सुनील गरड, शहरातील पत्रकार बांधव व नागरिक तसेच व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply