kinwat today news

दहेगाव (चि) येथील राधा कृष्णा मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव संपन्न

किनवट: आमदार भीमराव केराम यांच्या उपस्थितीत तालुक्यातील ग्राम दहेगाव येथील राधाकृष्ण मंदिर मध्ये काल दिनांक 11 ऑगस्ट 2020 रोजी श्रीकृष्ण जन्ममोहत्सव रात्री बारा वाजता मंदिराचे पुजारी मिरची महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला.सदरच्या कार्यक्रमात अनेक भाविक भक्तांची उपस्थिती होती.या कार्यक्रमात सोशल डिस्टंसिंग चे पालन करण्यात आले.

आज दिनांक 12 ऑगस्ट 2020 ला गोपालकाला चे सकाळी 8 ते 12 च्या दरम्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार भीमराव केराम किनवटचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, भाजपा तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे अनिल तिरमनवार,मंदिराचे सचिव अरुण भंडारे, पत्रकार विजय जोशी व असंख्य भाविक भक्त गन उपस्थित होते.


श्रीकृष्णाचे दर्शन व पूजन केले आटोपल्या नंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले .याप्रसंगी covid-19 संबंधीच्या नियमाचे पालन करण्यात आले.
याप्रसंगी गावातील सरपंच पोलीस तसेच इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply