kinwat today news

कोविड केअर नविन तहसिल इमारत येथे पत्रकार प्रमोद पोहरकर यांचा वाढदिवस केक कापुन मोठ्या आनंदात साजरा

किनवट: किनवट कोविड केअर सेंटर येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व कोविड केअर सहाय्यक नोडल अधिकारी डॉ. भागश्री वाघमारे (डुडुळे ),डॉ.आशिष डुडुळे ,डॉ. केन्द्रे , डॉ. ओव्हळ व कोवीड केअर सेन्टरचे कर्मचारी एम.यु. राऊत , श्रीमती आर.ए.साखरे, एम. आय. दिंडे, श्रीकांत माने . व न. पा. कर्मचारी यांच्या व सर्व रुग्णाच्या उपस्थीतीत सोशल डिस्टंस ठेवत कोविड केअर नविन तहसिल इमारत येथे पत्रकार प्रमोद पोहरकर यांचा वाढदिवस केक कापुन मोठ्या आनंदात साजरा केला गेला .
कोरोना पॉझीटीव्ह झाल्यास कोणीही घाबरण्याचे कारण नाही सर्वांचे आरोग्य व्यवस्थित रहावे, सदृढ रहावे या करीता शासनाने आपल्या आरोग्या बाबत अनेक सुविधा प्राप्त करून दिल्या आहेत, कोविड केअर सेंटर मधील सर्व रुग्णानी कोणतीही काळजी न करता आनंदी रहावे , नियमीत रोज सकाळी सोशल डिस्टंस ठेवून योगा करावा असे अनमोल मार्गदर्शन कोवीड केअर सहाय्यक नोडल अधिकारी डॉ . भाग्यश्री वाघमारे (डुडुळे) यांनी सर्व रुग्णांना केले .

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply