kinwat today news

अंगणवाडी चा पौष्टीक आहार योजनेतील आहाराचे पाकीट बालकांना वाटप करण्याऐवजी रस्त्याच्या कडेला फेकल्याची खळबळजनक घटना

किनवट = (ता.प्र.) दि. १० देशाची येणारी नविन पिढी अधिक सुदृढ व बौध्दीक दॄष्ट्या उज्वल निर्माण व्हावी या दृष्टीने राज्यशासन अंगणवाडी मधील बालकांना पौष्टीक आहार पुरवते त्यामुळे समाजातील कोणत्याही स्तरातील बालक हा कुपोषीत राहु नये असा त्या मागचा उद्देश असतो परंतु निष्काळजीपणा मुळे या योजनेचा किनवट तालुक्यात नुसता बोजबारा वाजला आहे. तर निष्काळजीपणाचा कळस असा झाला कि, जे पौष्टीक आहार योजनेचे आहाराचे पाकीट बालकांना वाटप करण्याऐवजी रस्त्याच्या कडेला फेकुन देण्यात आले आहेत.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, ग्रामीण भागातील गोरगरीब मजूर आदिवासींच्या मुलांचे व गर्भवती महिलांची प्रकृती सुदृढ व्हावी व कुपोषण मुक्त व्हावे यासाठी एकीकडे शासन करोडो रुपये खर्च करतो पण संबंधीत महिला व बालकल्याण विभागातील निगरगट्ट व भ्रष्ट प्रशासन याची अंमलबजावणी करीत नाही. हे आता स्पष्ट उघड झाले असून मौजे गोकुंदा/कोठारी येथील एमजीएम महाविद्यालयाच्या समोर रोडच्या बाजूस गटारांमध्ये 200 ते अडीचशे एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागामार्फत कुपोषित मुलांकरीता वाटप करण्यात साठी शासनाने पाठवलेले पौष्टिक आहाराचे पाकीट अक्षरश: उकिरड्यावर आढळून आले, यामुळे जनसामान्याकडुन संताप व्यक्त करण्यात येत आहे, सदर विभागात कर्तव्यावर असलेल्या अंगणवाडी पर्यवेक्षिका वर तालुका बालविकास अधिकाऱ्यांचे अजिबात लक्ष नाही, नियंत्रण नाही. याविषयी पत्रकारांनी किनवट तहसीलदारांना सूचना देताच तहसीलदार उत्तम कागणे यांनी महिला बाल प्रकल्प अधिकारी श्री बागल यांना तातडीने घटनास्थळी बोलावून घेतले व संबंधित घटनेचा पंचनामा करण्यात आला सदरील घटनेचा पंचनामा होऊन ५ दिवस झाले असुन ही सदर घटने बाबत संभ्रम कायम असुन तहसिलदार यांनी या बाबत काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे. व ते पोषक आहार योजनेचे उकिरड्यावर फेकण्यात आलेले पाकीट ते गोर गरीबांना का वाटण्यात आले नाही. तर गरिबांच्या तोंडातला घास गटारांमध्ये फेकून देणाऱ्या कर्मचाऱ्यावर व अधिकाऱ्यावर आता कोणती कार्यवाही होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकात्मिक बाल विकास कार्यालयातील अंगणवाडीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या बहुतेक मुख्य सेविका ह्या नांदेड येथे वास्तव्याला राहतात तेथुनच ये-जा करतात व कार्यभार सांभाळता याबाबीकडे एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील अधिकारी जाणिवपुर्वक दुर्लक्ष करतात तर सदर पौष्टीक आहार योजनेतील पॉकिट ची मुदत ३० जुलै रोजी संपुष्टात आली तर ५ ऑगस्ट रोजी ते फेकण्यात आले. हा माल कोणत्या अंगणवाडीचा हा शोध लावणे संबधित अधिका-यां समोर आव्हाण आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

5 thoughts on “अंगणवाडी चा पौष्टीक आहार योजनेतील आहाराचे पाकीट बालकांना वाटप करण्याऐवजी रस्त्याच्या कडेला फेकल्याची खळबळजनक घटना

Leave a Reply