kinwat today news

दिव्यांग मित्र नांदेड ॲप वर दिव्यांग यांची नोंदणी नझाल्याने हजारो दिव्यांग लाभापासून वंचित.

किनवट प्रतिनिधी: दिव्यांग मित्र नांदेड ॲप जिल्ह्यातील अति दुर्गम व डोंगराळ भाग असलेला एकेकाळी नक्षल वादाने प्रभावित असलेला किनवट तालुका हा आदिवासी तालुका म्हणून संपूर्ण भारतामध्ये त्याची ओळख आहे तालुक्यामध्ये दिव्यांग लाभार्थीचा जीवनमान उंचावण्यासाठी शासन पदोपदी प्रयत्न करत असून त्या अनुषंगाने किनवट तालुक्यात लाभार्थ्यांची अंदाजे संख्या 3 ते 4 हजार च्या जवळपास असून ग्रामपंचायत स्तरावर याची पूर्ण नोंदणी न झाल्यामुळे किनवट तालुक्यातील एकून ग्रामपंचायती 134 असून त्यापैकी केवळ लाभार्थी संख्या 729 नाव नोंदणी झाली असून तसेच किनवट नगरपरिषद अंतर्गत केवळ 139 लाभार्थ्यांची उपरोक्त ॲप’वर नोंदणी झालेली आहे.
परंतु लाभार्थी नोंदणी न झाल्यामुळे लाभापासून वंचित आहेत त्या अनुषंगाने अखिल भारतीय दिव्यांग कामगार संघटना किनवट तालुक्याच्या वतीने दिनांक 14/08/2020 रोजी पासून पंचायत समिती कार्यालयासमोर स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला आमरण उपोषणात लाभार्थ्यास तह अधिकारी संघटनेचे पदाधिकारी आमरण उपोषणास बसणार आहेत असे संघटनेचे तालुका सचिव राज माहुरकर यांनी विविध कार्यालयाला पत्रव्यवहार करून दिलेले आहे. तथापि उपोषणादरम्यान मागण्या मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा प्रतिनिधी जवळ बोलताना दिला आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

4 thoughts on “दिव्यांग मित्र नांदेड ॲप वर दिव्यांग यांची नोंदणी नझाल्याने हजारो दिव्यांग लाभापासून वंचित.

Leave a Reply