kinwat today news

हागणदारी मुक्त असलेल्या घूघुस शहरातील मुख्यरस्ताच घाणीच्या साम्राज्यात सापडला.

घूघुस:प्रतिनिधी
हागणदारी मुक्त असलेल्या घूघुस शहरातील मुख्यरस्ता घाणीच्या साम्राज्यात सापडलेला आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष सत्यनारायण डकरे यांनी सरपंचाकडे केली आहे.
मुख्य मार्गावरील तलावापासून ग्रामपंचायत आठवडी बाजार, गुजरी मच्छी मार्केट कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेचा प्रात: विधीसाठी नागरिक वापर करीत आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरातच घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी ये-जा करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तीन वर्षांपूर्वी हागणदारी मुक्त गाव म्हणून घूघुस ची घोषणा करण्यात आली होती. मात्र येथील स्थिती आता वेगळीच असल्याचे चित्र येथे बघायला मिळत आहे.
सध्या स्थितीमध्ये अनेकांकडे शौचालय नसल्याने दिसून येत आहे. विशेष म्हणजे तलावाच्या स्वच्छतेकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी पाणी दूषित झाले असून पाण्याची दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे. त्यातच बाजूच्या एका नालीचा उपसा केला जात नसल्याने दुर्गंधी पसरली आहे .त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सत्यनारायण डकरे यांनी सरपंचांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून या मोठ्या ग्रामपंचायतीची अशी व्यवस्था असल्याने प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

3 thoughts on “हागणदारी मुक्त असलेल्या घूघुस शहरातील मुख्यरस्ताच घाणीच्या साम्राज्यात सापडला.

Leave a Reply