kinwat today news

वसरणी येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(बिएलओ) यांच्या कडून कोरोना-१९ चा तपासणी सर्वेक्षण प्रगतीपथावर

नांदेड प्रतिनिधी :
महानगरपालिका व ग्रामीण भागात जिल्हा प्रशासनाने केंद्रस्तरीय अधिकारी(बिएलओ) यांच्या माध्यमातून शहरी भागात १५ झोन तयार करण्यात आले .
त्या पैकीच झोन क्रमांक-१४ मध्ये महा पालिका कौठा दवाखान्यातील डॉ बालाप्रसाद कुंटूरकर यांच्या पदकांच्या टीम मध्ये वसरणी येथील कोविड ची तपासणी मोहीम चालू आहे वसरणी या गावातील प्रत्येक घरी जाऊन कुटुंब पाहणी व वयोवृद्ध वय ५० वर्षावरील च्या लोकांच्या कोविड ची लक्षणं असतील अश्याच तपासणी मोहीम सकाळी ०९ ते १२ या वेळात केली जात आहे .

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) ग्लोबल इन्फ्लूएंझा पाळत ठेवण्याचे मानदंड इन्फ्लूएन्झासारखे आजार (आयएलआय) आणि गंभीर तीव्र श्वसन संक्रमण (एसएआरआय) साठी पाळत ठेवण्याच्या केसांची संख्या या विषयावर माहितीसत्व
व्याख्या परिभाषित करतात.
व्याख्या :-इन्फ्लूएंझा संसर्गामुळे क्लिनिकल सिंड्रोम इतर श्वसन संसर्गापासून सहजपणे फरक होत नाही.
आयएलआय आणि एसएआरआयच्या प्रकरणांची व्याख्या ही सर्व प्रकरणे हस्तगत करण्याच्या उद्देशाने नसून कालांतराने ट्रेंडचे वर्णन करण्यासाठी करतात.
जागतिक स्तरावर एक सामान्य केस परिभाषा वापरल्यास राष्ट्रीय आरोग्य अधिकार यांना आंतरराष्ट्रीय डेटामध्ये त्यांच्या डेटाचे स्पष्टीकरण करण्याची परवानगी मिळेल.

*तज्ज्ञांच्या सल्ल्याने एकूण ३ प्रकारे वर्गीकरण करण्यात आले यात १. सारी आजार २.आयएलआय (गंभीर तीव्र श्वसन संक्रमण) ३. हायपो क्रिसिया*

याची सौम्य लक्षणे दिसून आली की त्याची ऑनलाईन रेपोर्टिंग दुपारी ०१ वाजेपर्यंत जिल्हा प्रशासनाने दिलेल्या लिंकवर करणे हे संबंधित केंद्रस्तरीय अधिकारी(बिएलओ) यांची जबाबदारी ठरवून दिले आहे
वसरणीत ०३ बिएलओ हे काम करीत आहेत.
या कामी केंद्रस्तरीय अधिकारी(बिएलओ) प्रा .इरवंत रा.सुर्यकार यांनी महात्मा फुले चौक वसरणी या परिरातील मा.भानुदास पुरभाजी पवळे यांची तपासणी च्या वेळी प्रतिनिधी शी सवांद करताना ही माहिती दिली आहे.
याच डॉ.बालाप्रसाद कुंटूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक मा. दिलीप इंदूरकर , प्रभागात केंद्रस्तरीय अधिकारी(बिएलओ) प्रा .इरवंत सुर्यकार, ,नारायण आठवले,राजेश भांगे ,यादव नव्हरे ,सुनील जगताप हे कोरोना योद्धे म्हणून काम करीत आहेत…

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

4 thoughts on “वसरणी येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(बिएलओ) यांच्या कडून कोरोना-१९ चा तपासणी सर्वेक्षण प्रगतीपथावर

Leave a Reply