kinwat today news

विविध ज्वलंत मागण्यांसाठी ‘माकप’ व जनसंघटनांनी आज केले आंदोलन

किनवट,दि.९ : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटनांच्या वतिने रविवारी (दि.९)क्रांतीदिनी विविध मागण्यांसाठी येथे व तालुक्यातील अनेक गावात आंदोलन करण्यात आल्याचे ‘माकप’,च्या राज्य समितीचे सदस्य अर्जुन आडे यांनी सांगितले.

उत्पन्न कर न देणाऱ्या सर्व जनतेला दरमहा १० हजार ५०० रुपये पुढील सहा महिने द्या, माणसी १० किलो मोफत धान्य उपलब्ध करून घ्या, मनरेगा योजनेतून दोनशे दिवस काम व सहाशे रुपये मजुरी ग्रामीण व शहरी श्रमिकांना द्या, सार्वजनिक उदयोगांचे खाजगी करन रद्द करा,परदेशी व देशी मक्तेदारांना सवलती बंद करा,शेतमजूरांना मागेल त्या गावात रोजगार हमीचे कामे उपलब्ध करून द्या, शेतकऱ्यांना कर्जमाफ करून तात्काळ कर्ज वाटप करा,या व इतर काही मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

तालुक्यात तोटंबा, मांनसींग नाईक तांडा, दिपला नाईक तांडा, चंद्रु नाईक तांडा, मार्लागोंडा, चिखली, कंचली, अप्पारापॆठ, दुर्गानगर, रीठ्ठा, नंदगाव, नंदगाव तांडा, परोटी , बुरकुलवाडी, पांगरी ,हुडी, कुपटी सोनवाडी, लोखंडवाडी, कनकी,नागापुर, लोणी, तल्हारी आदि गावात हे आंदोलन झाले.
आंदोलनाच्या मागण्यांचे निवेदन संबंधित ग्रामसेवक,तलाठी यांना देण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व मा.क.पा चे नेते काॅ.अर्जुन आडे ,जनार्दन काळे,काॅ.स्टॅलिन आडे शेतकरी नेते खंडेराव कानडे, काॅ.आनंद लव्हाळे, प्रकाश बोड्डेवार, लक्ष्मण राठोड, काॅ.गोविंद चव्हाण, काॅ.विजय जाधव, काॅ.मोहण जाधव,काॅ.तानाजी राठोड, काॅ.मनोज सल्लागार, काॅ.प्रशांत जाधव,शिवाजी किरवले, देविदास खोकले , काॅ.खिरु आडे ,काॅ.टिकाराम राठोड ,काॅ.प्रकाश आडे, देविदास राठोड,अजय राठोड आदिंनी केले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

6 thoughts on “विविध ज्वलंत मागण्यांसाठी ‘माकप’ व जनसंघटनांनी आज केले आंदोलन

Leave a Reply