kinwat today news

किनवट तालुक्यात जुळ्या भावाने रचला इतिहास

किनवट :येथील प्रियांशू राठोड व हिमांशू राठोड या जुळ्या भावाने नुकतेच जाहीर झालेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेत जवळपास समान गुण मिळवून इतिहास रचला आहे. हिमांशू आणि प्रियांशू हे जुळे भाऊ किनवट तालुक्यातील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, गोकुंदा या शाळेत शिक्षण घेत होते, १० वी बोर्डाच्या परीक्षेत प्रियांशू अरविंद राठोड यास ४७५ गुण तर हिमांशू अरविंद राठोड ४६५ गुण मिळाले. केवळ१० गुणाच्या फरकाने लहान प्रियांशू ला थोडे जास्त गुण तर मोठ्या हिमांशू ला थोडे कमी गुण मिळाले असले तरी दोघांना जवळपास सर्व विषयात चांगले गुण मिळाले आहेत.
इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, गोकुंदा चे मु. अ. तथा सचिव (किनवट तालुका मुख्याध्यापक संघ) तथा, अध्यक्ष (विनाअनुदानित कृती समिती, किनवट) तसेच शहर संयोजक(गोर सेना किनवट) श्री. अरविंद राठोड यांची मुले आहेत. प्रियांशू राठोड हा प्रस्तुत शाळेतुन ९५%गुणा सह प्रथम, तर हिमांशू राठोड याने ९३% गुणा सह द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष अॅड. सचिन राठोड, श्रीमती. स्वाती राठोड, प्रविण राठोड (नगर सेवक न. प. किनवट) मुख्याध्यापक अरविंद राठोड, आणि सर्वच विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे हिमांशू आणि प्रियांशू या जुळ्या भावाने दैदीप्यमान असा निकाल दिला आहे. त्यामुळे सर्वच शिक्षण प्रेमी व्यक्तीकडुन कौतुक करण्यात येत आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

6 thoughts on “किनवट तालुक्यात जुळ्या भावाने रचला इतिहास

Leave a Reply