kinwat today news

अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी ऑनलाईन कार्यशाळा

नांदेड (जिमाका) दि. 5 : दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका प्रवेशाच्या अनुषंगाने विद्यार्थी व पालकांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे हे सोमवार 7 ऑगस्ट 2020 रोजी ऑनलाईन कार्यशाळा सकाळी 11.30 वा. आयोजित करण्यात आली आहे. दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व पालकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासकिय तंत्रनिकेतनचे प्राचार्य यांनी केले आहे.

कोविड-19 च्या अनुषंगाने प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया व पदविका अभ्याक्रमानंतर विविध क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या संधी व महाविद्यालय व शाखा निवड करण्यासाठी विद्यार्थी व पालकांच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी meet.google.com/kkw-ighe-tfc व https://youtu.be/zkVghQ5ZuBs ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर करणार आहेत. या meet.google.com/kkw-ighe-tfc व प्लॅटफॉर्मवर 11.20 वाजेपर्यत नोंदणी करावी. या मार्गदर्शनाच्या मिटींगची लिंक gpnanded.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घ्यावी, असेही आवाहन केले आहे.
00000

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

5 thoughts on “अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी ऑनलाईन कार्यशाळा

Leave a Reply