kinwat today news

दैनिक साहित्यसम्राट चे जिल्हा प्रतिनिधी मारोती शिकारे यांचा “कोरोना योध्दा” म्हणून सन्मान.

नांदेड: (आनंद भालेराव)
कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नाशिक द्वारे जागतिक आपत्ती ठरलेल्या covid-19 विषाणूमुळे पसरत असलेल्या महाभयंकर साथीचा प्रसार रोखण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वयंस्फूर्तीने निरपेक्ष जनतेची सेवा करणाऱ्यांना covid-19 “कोरोना योद्धा” पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. नांदेड येथील दैनिक साहित्यसम्राट चे जिल्हा प्रतिनिधी मारोती शिकारे यांचे या काळातील योगदान लक्षात घेऊन कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने त्यांना covid-19 “कोरोना योद्धा” म्हणून सन्मानपत्र सन्मानित केले आहे.या प्रमाणपत्रावर संस्थापक अध्यक्ष सौ.सुनीता मोडक, महाराष्ट्राच्या सलागार सौ.दिपाली चांडक उपाध्यक्ष व खजिनदार सौ. कल्याणी मोडक, जनसंपर्क अधिकारी राजेश आंधळे यांच्या स्वाक्षरीने सन्मानपत्र वितरीत करण्यात आले आहे.त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तसेच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. किनवट टुडे न्युज नेटवर्क च्या वतीने मारोती शिकरे साहेबांचे अभिनंदन ! व पुढील कार्यास शुभेच्छा!

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

4 thoughts on “दैनिक साहित्यसम्राट चे जिल्हा प्रतिनिधी मारोती शिकारे यांचा “कोरोना योध्दा” म्हणून सन्मान.

Leave a Reply