kinwat today news

नांदेड जिल्ह्यातील अनेक दिव्यांग बांधव दिव्यांग मिञ अँप पासुन वंचित वरिष्टाच्याआदेशाला कनिष्ठ अधिकारी दाखवली केराची टोपली – चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर

नांदेड: नांदेड जिल्हयातील दिव्यांग बांधवांना शासकीय योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी व समस्या सोडविण्याच्या दृष्टीने ‘ दिव्यांग मित्र नांदेड ‘ हे अॅप तयार करण्यात आले असून सदरील अॅप आपल्या मोबाईलवर प्ले स्टोअर मधून डाऊनलोड ,करून त्यातील माहिती अचूक भरावी म्हणून
म्हणून त्या अँपचे प्रशिक्षण सर्व गटविकास अधिकारी यांना देऊन प्रत्येक गावात ग्रामसेवक व ग्रामपंचायत आँफरेटर यांना आदेश देऊन सुद्धा त्यांची प्रभावी अंमलबजावणी नांदेड जिल्ह्यात न झाल्याने अनेक दिव्यांग या नोंदणी पासुन वंचित राहात आहेत.
समाज कल्याण जिल्हा परिषद विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या दिव्यांगांच्या विविध योजना अधिक प्रभावीपणे समाजातील दिव्यांगांपर्यंत पोहचविण्यासाठी गरजू दिव्यांग बांधवांना त्यांचा लाभ मिळावा म्हणून *दिव्यांग मित्र नांदेड* हे अॅप नव्याने विकसित करण्यात आले असून नांदेड येथे प्रस्तूत अॅपचे ऑनलाईन उद्घाटनराज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हयाचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे .
सदरील अॅपच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना आपली नोंदणीनऊ फोल्डर सविस्तर माहिती भराता येत नाहि तर अनेकांकडे मोबाईल नसते असला तर रिचार्ज नसते अशा अडचणी निर्माण होऊ नये एकही दिव्यांग वंचित राहू नये .

म्हणून त्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणुन दि 14 जुलै ते 31 जुलै पर्यंत नोंदणी करण्यासाठी दिव्यांग संघटना. सामाजिक कार्यकर्ते यांना विचारात घेऊन नोंदणी करावी असे आदेशीत करून सुध्दा कोणत्याही गटविकास अधिकारी यानी विचारात न घेता लवकर आदेश न दिल्याने ग्रामपंचायत आँफरेटर, हे विमा भरण्यात गुंग असल्याने व ग्रामसेवक प्राणी भेटत नसल्याने हे लक्षात घेऊन अनेक संघटनेनी सोशल मिडिया वर माहिती दिल्यामुळे कांही प्रमाणात दिव्यांग बांधव वनवन भडकून सेतु केंद्र मिञाकडे नोंदणी केली आहे़
पण अनेक दिव्यांग बांधव वंचित राहात असल्याचे फोन येत असल्याने डाकोरे यांनी गटविकास अधिकारी यांना फोनवर माहिती दिली असता चालु आहे आम्ही करीत आहे असे उतर मिळताच 31 जुलै ला नोंदणी होती आज 1 आँगस्ट ते 10 आँगस्ट पर्यंत छाननी आहे असे म्हणता छाननी आमच्या कडेच आहे असे उतर मिळत असून प्रशासकीय अधिकारी वरिष्ठाच्या आदेशाची अंमलबजावणी करीत नसल्याने अनेक योजना दिव्यांग बांधवाना मिळत नसल्याची खंत दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर. माधव शिंदे. ज्ञानेश्वर नवले. राजु शेरकुरवार शंकर शिंदे. विठल बेलकर यादव फुलारी बालाजी ताटे, मोहन कऊटकर सुदर्शन सोनकांबळे, जाधव ज्ञानेश्वर, पांडुरोग सुर्यवंशी,सलिम दौलताबादी, हंनमत हेळगिर,
यांनी प्रसिद्ध केले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

5 thoughts on “नांदेड जिल्ह्यातील अनेक दिव्यांग बांधव दिव्यांग मिञ अँप पासुन वंचित वरिष्टाच्याआदेशाला कनिष्ठ अधिकारी दाखवली केराची टोपली – चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर

Leave a Reply