kinwat today news

विद्यमान आमदार भिमराव केराम, यांनी मतदारसंघ पिंजुन काढत शक्य तितके सहाय्य करण्याकरीता अहोरात्र परिश्रम घेतले

किनवट ता.प्र दि ३१
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावानंतर जनजिवन विस्कळीत झाले नागरीकांना अतोनात हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या काळ खुप कठीण चालु आहे परंतु या बिकट परिस्तितीत ही नागरीकांनी दाखवलेल्या विश्वासाला सार्थ खरे ठरले ते विद्यमान आमदार भिमराव केराम, यांनी मतदारसंघ पिंजुन काढत प्रशासकीय यंत्रणा सोबत ताळमेळ बसवला व नागरीकांना शक्य तितके सहाय्य करण्याकरीता अहोरात्र परिश्रम घेत असल्याची माहिती भाजपा नेते अनिल तिरमनवार यांनी दिली. यातुनच आ.केराम यांनी कोरोनां विषाणुच्या संसर्गाच्या काळाता स्वतःच्या आरोग्याची कोणतीही तमा न बाळगता किनवट माहुर विधानसभा मतदारसंघातील वानोळा, माहुर, वाई, सिंदखेड, उमरी, मांडवी, किनवट , अप्पारावपेठ, इस्लापुर, बोधडी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्नालयला भेट देऊन नागरीकांच्या आरोग्याच्यादृष्टीने उपयुक्त अशा विविध सुचना आरोग्य यंत्रणेतील कर्मचा-यांना दिल्या यामुळे प्रशासकीय यंत्रणा ही कोरोना काळात सतर्क राहीली व नागरीकांची गैरसोय झाली नाही नागरीकांना विविध आजाराकरीता आवश्यक संसाधने उपलब्ध झाली व दळणवळनाच्या साहित्याची उपलब्धता राहीली. तर आमदार केराम यांनी मतदारसंघातील नागरीकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देऊन लॉकडाउन काळात दळणवळणाची साधने बंद असतांना आमदारांच्या स्थानिक विकास निधीतुन किनवट, मांडवी, माहुर या गावाकरीता प्रत्येकी १ असे एकुण ३  प्रशस्त अँम्बुलंन्स उपलब्ध करुन दिल्या तर आदिवासी एकात्मिक प्रकल्प कार्यालयाकडुन ५ अँम्बुलंन्स उपलब्ध करुन दिल्या अशा प्रकारे अल्प कालावधीत नागरीकांच्या सोई करीता व आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील अशा एकून 8 अँम्बुलंन्स उपलब्ध झाल्या आहेत यामुळे अत्यावस्त रुग्न व तातडीच्या उपचाराची आवश्यकता असलेल्या रुग्नाला एकाद्यावेळी आदिलाबाद, यवतमाळ, नांदेड येथे तातडीने हलवण्याची सोय झाली आहे.
तर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सहाय्यतून त्यांच्या खासदार निधीतून किनवट , माहूर विधानसभा मतदारसंघाकरिता 10 व्हेंटिलेटर लवकरच उपलब्ध होणार आहेत त्यापैकी किनवट येथे 6 , माहूर येथे 3 तर मांडवी येथे 1 व्हेंटिलेटर बसवण्यात येणार आहे.
      आरोग्याच्या दृष्टीने केलेल्या प्रयत्नानंतर आ.केराम यांनी वन्यप्राण्याच्या दृष्टीने देखिल अनेक प्रयत्न केले आहे तर राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे स्वतः आ.केराम यांनी पुढाकार घेउन वन्यप्राण्याच्या पिण्याच्या प्रश्नाला कायमस्वरुपी सोडवण्याकरीता एकुण १५ वनतळे मंजुर करुन घेतले आहे ज्यामुळे एकुण १५ कोटी रुपये किमतीचे वनतळे निर्माण केले जाणार असुन त्यामुळे कोरोना काळात रोजगार हरवलेल्या नागरीकांना व मजुरांना यातुन रोजगार देखिल उपलब्ध होणार आहे.
खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांकडील मका आणि ज्वारी शासनाने मतदारसंघात प्रथमच खरेदी केली त्यामुळे आ भीमराव केराम यांनी समाधान व्यक्त केले.
      देशाच्या रस्त्याचे कायाकल्प करणारे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ज्यांना रोडकरी या नावाने देखिल ओळखले जाते त्या कार्यसम्राट केंद्रीय मंत्र्याची आ.केराम यांनी स्वतः भेट घेऊन किनवट माहुर विधानसभा क्षेत्रातील अंतर्गत रस्त्याच्या विकासासाठी विविध प्रस्ताव सादर केले आहे ज्यामध्ये प्रमुख प्रस्ताव सारखणी ते उनकेश्वर , तलाईगुडा  रस्त्याकरीता १५० कोटी निधी प्रस्तुत करण्याची विनंती केली आहे ज्यामुळे याभागातील नागरीकांच्या रस्त्याचे कायमस्वरुपी मागणी याव्दारे सुटणार आहे. तर चिखली, बोथ, इस्लापुर, माहुर भागातील रस्त्यांकरीता १२० कोटी रुपयांचे प्रस्ताव आ.केराम यांनी दिले आहे.
      उर्जामंत्री नितिन राऊत यांची भेट घेऊन माहुर येथे १३२ के.व्ही च्या विद्युत केंद्राचा प्रस्ताव दिला आहे जेणे करुन माहुर तालुक्यातील नागरीकांचा विजेचा प्रश्न हा कायमस्वरुपी निकाली निघणार आहे.तर किनवट माहुर मतदारसंघातील विजे संबधीत विविध प्रश्न सोडवण्याकरीता व शेतक-यांना मुबलक प्रमाणात डि.पी ची उपलब्धता होण्याकरीता वनमंत्री संजय राठोड यांच्या समन्वयातुन वन विभाग व उर्जा विभागातील समन्वय साधुन दिला आहे जेणे करुन प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडवले जातील.
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्या भेटीतुन किनवट माहुर मतदारसंघात १०० कोटी रुपये किमतीचे काम मंजुर झाले असुन गोकुंदा येथिल शासकीय विश्राम गृहाच्या दुरुस्ती करिता २ कोटी रुपये उपलब्ध झाले असुन कोठारी येथिल नाल्यावर पुलाची जी अनेक वर्षापासुन ची मागणी स्थानिक नागरीकांची होती ते कोठारी येथिल नाल्यावरी पुल मंजुर करण्यात आले आहे ज्याचे काम काही दिवसात शिघ्रतेने सुरु होईल व येथिल नागरीकांचा पावसाळ्यात किनवट शी तुटनारा संम्पर्क हा अजुन सुकर होणार आहे.
      मतदारसंघातील दिव्यांगाना मतदारसंघातील विविध स्थानिक स्वराज्य संस्था जसे नगर परिषद, पंचायत समिती च्या माध्यमातुन ५ टक्के निधी उपलब्ध करुन दिला आहे. यातुन कोरोना काळातील यांच्या प्रपंच सुकर झाला असुन याकडे आ. केराम यांनी जातीने लक्ष दिले आहे तर विविध पदाधिका-यांना सुचना दिल्या आहेत.
      कोरोना काळात नागरीकांच्या आरोग्याच्या प्रती संवेदना दर्शवत आ.केराम यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतींनी आपआपल्या स्तरावर चौदाव्या वित्त आयोगाचा निधी वापरत आरोग्य विषयक विविध बाबीची पुर्तता केली आहे.
      कोरोना काळात सर्वत्र दुर्लक्षित करण्यात आलेल्या व नेहमीच प्रशासकीय मदतीपासुन वंचीत राहणा-या कोलाम जमातीच्या वाडीवर व वस्तीवर आदिवासी प्रकल्प कार्यालय व आदिवासी विकास महामंडलाकडुन धान्य पुरवठा आमदार केराम यांच्या सुचनेवरुन करुन करण्यात आले आहे.
आदिवासी विकास मंत्री के.सी पाडवी यांच्या समन्वयातुन मतदारसंघात विविध उपाय योजनाकरिता ४० कोटी रुपये निधी मंजुर करण्यात आला यातुन आदिवासी समाजाच्या विविध समस्या सोडवण्यात येणार आहे.
      किनवट ते आदिलाबाद जाणारा रस्ता हा घोगरवाडी मांडवा मार्ग सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या माध्यमातुन या रस्त्याची अनेक वर्ष जुनी मागणी सोडवण्यात आली असुन यामुळे घोगरवाडी सारख्या दुर्गम गावाला जाण्याकरी सुसज्ज रस्ता उपलब्ध होणार आहे व तेलंगाना तील आदिलाबाद जिल्ह्याला जाण्याकरीता मार्ग सुकर होनार आहे जे की फक्त ६०० मीटर रस्ता तयार करण्यात आला तर आदिलाबाद येथे जाण्याकरीता २० कि.मी एवढे अंतर कमी होनार आहे.
 एकूनच आमदार केराम यांच्यावर किनवट माहुर विधानसभा मतदारसंघातील नागरीकांनी व मतदारांनी दाखवलेला विस्वास सार्थ ठरवला असुन राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, भाजप परिवाराच्या माध्यमातुन जो जनसेवेचा व्रत त्यांनी घेतला आहे त्यास सिद्ध करणार असल्याचे त्यांच्या एकुणच त्यांच्या वाटचालीवरुन निदर्शनास येत आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

4 thoughts on “विद्यमान आमदार भिमराव केराम, यांनी मतदारसंघ पिंजुन काढत शक्य तितके सहाय्य करण्याकरीता अहोरात्र परिश्रम घेतले

Leave a Reply