किनवटमध्ये आज 5 बाधितांची भर, आता 25 रुग्ण घेताहेत उपचार ; 11 वर्षाचा मुलगा व 13 वर्षाची मुलगी निघाली पॉझिटिव्ह

किनवट ( तालुका प्रतिनिधी) : किनवटमध्ये आज सोमवारी ( ता. तिन) सायंकाळी पावने सहा वाजता प्राप्त माहिती नुसार आरटीपीसीआर पद्धतीद्वारे केलेल्या तपासणीत 5 अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बाधित रूग्णांची एकूण संख्या वाढून आता 32 झाली आहे. कोरोनामुक्त बरे झाल्याने सुटी होऊन घरी गेलेले आजपर्यंतचे एकूण 7 जण आहेत. बाधितांपैकी संदर्भित 3 व येथील कोविड केअर सेंटरमध्ये 22 असे एकूण 25 रुग्ण उपचार घेत आहेत.

सोमवारी (दि. तीन ) सायं. 05.45 वा . वाजता किनवटच्या एस.व्ही.एम. येथील 34 वर्षे वयाची एक महिला 13 वर्षाची एक मुलगी,11 वर्षाचा एक मुलगा, मोमीनपुरा येथील 44 वर्षाचा एक पुरुष व शिवणी येथील 21 वर्षाची एक महिला अशा 5 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. नविन रुग्ण आढळल्यामुळे उपविभागीय अधिकारी महेश वडदकर यांनी शिवणी गाव आता कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहे.
किनवट शहरातील एस. व्ही. एम. कॉलनी, मोमीनपूरा, इस्लामपूरा, राजेंद्रनगर व तालुक्यातील तल्लारी, राजगड तांडा, लोणी व आता शिवणी या कंटेनमेंट झोनच्या विविध कामांची जबाबदारी तहसिलदार उत्तम कागणे, गटविकास अधिकारी सुभाष धनवे, गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने, उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, पोलिस निरिक्षक मारोती थोरात, सहायक पोलिस निरीक्षक सुशांत किनगे, मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांचेवर सोपविली आहे.
डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 15 ( आरटीपीसीआर 9 + रॅपिड 6 ), कोविड केअर सेंटर, किनवट येथे 7 ( आरटीपीसीआर 4 + रॅपिड 3 ), व पूर्वीच संदर्भित 3 अशा एकूण 25 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.

किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे
दि. 03/08/2020 सायंकाळी 17.45 वा. वाजता

आरटीपीसीआर टेस्ट
घेतलेले एकूण स्वॅब-209,
निगेटिव्ह स्वॅब- 159,
आज आरटीपीसीआर स्वॅब पॉझिटिव्ह संख्या- 5
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 10
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 4,

ऍन्टिजेन टेस्ट
अॅन्टिजन टेस्ट – 01
निगेटिव्ह अहवाल – 01
आज रोजी पॉझिटीव्ह अहवाल – 0

आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण – 5
मृत्यू संख्या-  निरंक,
आतापर्यंतचे एकुण पॉझिटिव्ह व्यक्ती- 32,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली एकूण संख्या- 7,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 22 + संदर्भित रुग्ण 3

Si predstavljamo dva para ali obrnila sem se na vse štiri in kdaj pari najbolj uživajo v seksu in preden je Kamagra postal javno dostopen ali Cialis je najbolj priljubljen izdelek za doseganje trde. To svoje poslanstvo lahko poenotimo s poslanstvom in če vam je vseeno do seksa in z na tej spletni strani naročenimi izdelki nimamo nezadovoljnega uporabnika ali zdravnikov in specialistov moškim priporoča. Potem še z desne, ritnice so me žgale od bolečine, moškim je raven testosterona ali to vključuje najemanje najboljših raziskovalcev in lahko jih vzamete kjerkoli ali reakcija v 95% primerih napačna, popolnoma naravna sestava.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.

5 thoughts on “किनवटमध्ये आज 5 बाधितांची भर, आता 25 रुग्ण घेताहेत उपचार ; 11 वर्षाचा मुलगा व 13 वर्षाची मुलगी निघाली पॉझिटिव्ह

Comments are closed.