kinwat today news

सौ. सुशिला सत्यनारायण डकरे यांची घूघुस महिला अध्यक्षा म्हणून निवड.

घुगुस: घुगुस येथील रहिवासी व धडाडीच्या कार्यकर्त्या सौ. सुशिला सत्यनारायण डकरे यांची घूघुस महिला अध्यक्षा म्हणून निवड राज्याचे प्रसारण मंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी सर्वानुमते निवड करून तसे त्यांना नियुक्ती चे पत्र दिले आहे.
यावेळी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य, जिल्हा महिला अध्यक्ष बेबीताई उईके शहराध्यक्ष घुगुस शहराध्यक्ष श्रीनिवास गोसकुला, माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुरेश पाटील बोबडे,मागासवर्गीय सेल चे अध्यक्ष सत्यनारायण डकरे, शहराध्यक्ष बुद्ध राज कांबळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. धडाडीच्या महिला कार्यकर्त्या सुशिलाबाई डकरे यांच्या निवडीमुळे त्यांचे घुगुस शहरातून सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

5 thoughts on “सौ. सुशिला सत्यनारायण डकरे यांची घूघुस महिला अध्यक्षा म्हणून निवड.

Leave a Reply