kinwat today news

कोठारी येथील पत्रकार कांबळे यास जबर मारहाण व जातीवाचक शिवीगाळ करून लुटले सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मांडवी / प्रतिनिधि: इंद्रपाल कांबळेलहान मुलाच्या भांडणातून पत्रकार वैश्यपाल कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ तसेच जबर मारहाण करून त्याच्याकडील सोन्या ची चेन व सोन्या ची अंगठी काडुन घेणारे सात जना विरुध्द मांडवी पोलिश ठाणेत ऑट्रसिटी ॲक्ट अंतर्गत तसेच जबर चोरी या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेले आहे.

किनवट तालुक्यातील कोठारी सिंद येथील पत्रकार वैश्यपाल कांबळे यांचा मुलगा विश्वदीप याचा शेजारी राहणारा सचिन वाडगुरे यांनी 28 जुलै रोजी सकाळी मारहाण केली होती छोट्या मुलाचा वाद चालू असताना वैश्यपाल कांबळे यांनी तो वाद सोडवण्यासाठी गेले असता सचिन चे आजोबा किशन वाडगुरे सुद्धा तेथे आले लहान मुलाचा वाद हा मोठ्या माणसाचया भाडनात रूपांतर झाला दुसऱ्या दिवशी कांबळे हे शेतामध्ये गेले असताना तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उत्तमसिंग राठोड यांनी फोन करून कांबळे यांना सगीतले की तुमचा विरुद्ध समिति कड़े तक्रार आसुन तुम्ही जुन्या ग्रामपंचायतीच्या इमारतीजवळ या असे सांगितले त्यांनी बोलावल्यामुळे कांबळे शेतातून या जागी एकटेच पोहचले आधीच त्या जागी थांबलेले आरोपी किशन वाडगुरे, दत्ता वरगुडे, दीपक वाड़गुरे,प्रसाद वाडगुरे, मोहन वाडगुरे, पार्वतीबाई वाडगुरे, अर्चनाबाई वाडगुरे, यांनी कांबळे यांना शिवीगाळ केली गावात राजकारण करतोस तुझी लायकी आहे का भाड्या, जातीचा फायदा घेऊन उप सरपंच होतो बायको च्या नावावर जगतोस असे अपमानजनक व जातीवाचक शिवीगाळ केली या बाई नी कांबळे यांच्या गुप्त जागेवर पायाने त्याला मारले तर मुलांनी छातीवर डोक्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केले तर काहीजणांनी त्याच्याकडे सोन्याची चैन सोन्याची अंगठी काढून घेतली असे आरोप करण्यात आलेले आहे यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उत्तम राठोड यांनी हात धरला व तुम्ही भांडण मिटवायला आलेत की भांडण करायला आले असे म्हणून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण किसन वाडगे व इतर सहा जणांनी वैश्यपाल कांबळे यांना बेदम मारहाण करत होते ते तसेच बेहोश होत पर्यंत यांना मारत होते असे त्यांनी सांगितले त्याना मांडवी येथे दवाखान्यात नेले आसता ते बेहोश आहे म्हणून यवतमाल येथे हलविन्यत आले यावरून मांडवी पोलीस ठाण्यात किसन वाड़गुरे व सहा जन विरुद्ध ऑटॉसीटी ऍक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून 64,700 हा,रुपयांची चोरी असा गंभीर आरोप ठेवण्यात आलेला आहे या प्रकरणी माहुरचे पोलिस उप अधीक्षक विलास जाधव हे अधिक तपास करीत आहे

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

4 thoughts on “कोठारी येथील पत्रकार कांबळे यास जबर मारहाण व जातीवाचक शिवीगाळ करून लुटले सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply