kinwat today news

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त किनवट येथील अण्णाभाऊ साठे चौकात अभिवादन सोहळा संपन्न.

किनवट(आनंद भालेराव): साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त अण्णाभाऊ साठे चौक किनवट येथे अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किनवट न. पा. चे अध्यक्ष आनंद माच्छेवार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून किनवट/ माहूर चे लोकप्रिय आमदार मा. भिमराव केराम होते आ.भीमराव केराम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी आमदार भीमराव केराम यांच्यातर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त 100 अन्नधान्याचे किट चे गरजू व्यक्तींना वाटप करण्यात आले.
याप्रसंगी मार्गदर्शनपर बोलताना भीमराव केराम म्हणाले की, सदरील पुतळ्याच्या जागी भव्य आणि दिव्य स्मारक पुढच्या वर्षीच्या जयंती पर्यंत बनविण्याचा आमचा मनोदय आहे. नगरपालिका भाजपाच्या ताब्यात असल्यामुळे सदरील काम लवकरात लवकर करू असे याप्रसंगी आश्वासित केले. तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे श्रमिकांचे नेते होते. त्यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठे योगदान होते. तसेच शोषित, पीडित, कष्टकरी जनतेच्या अन्याला आपल्या धारदार लेखनीच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे कार्य केले. त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्राद्वारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारताचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार समजल्या जाणारा “भारतरत्न” पुरस्कार देऊन गौरविण्यात यावा. तसेच यावर्षी चे निमित्त साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी) च्या धर्तीवर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) ची स्थापना करण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळविले आहे. तसेच याचा आपण पाठपुरावा करीत राहू असे समाजाला आश्वासित केले
याप्रसंगी नगराध्यक्ष आनंद माच्छेवार, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेमानीवार, माजी न

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •