kinwat today news

श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय, दहेलीची इयत्ता 10वी च्या परीक्षेत निकालाची परंपरा कायम

किनवट टुडे न्युज: श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय, दहेलीची इयत्ता 10वी च्या परीक्षेत निकालाची परंपरा कायम राखली असून याही वर्षी शाळेचा निकाल 79.66%लागला असून दरवर्षी प्रमाणे सारखणी केंद्रातून सर्व प्रथम येण्याचा मान कु.कोमल नंदूजी गाढवे हिने 94% संपादन करून सुयश प्राप्त केले आहे.
गुणवंत विद्यार्थी कु.कोमल नंदूजी गाढवे-94%सर्व प्रथम ,सुरज आशीर्वाद दिसावार-82%द्वितीय,कु.साक्षी कैलास पाटील-80% तृतीय.हर्षल श्यामशेट्टीवार-79% चतुर्थ,कु.प्रतिक्षा हलवले-76.60%, विशाल राठोड-76.20%,कु.फाल्गुनी संजय काळे-75%, विशेषप्राविण्य-8, प्रथम श्रेणी- 11, द्वितीय श्रेणी-14व उत्तीर्ण-14झाले आहेत.
या घवघवीत सुयशा बद्दल संस्थेच्या अध्यक्षा तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री मा.श्रीमती सूर्यकांताताई पाटील मॅडम, सचिव डाॅ. देवेंद्र जोशी सर, उपाध्यक्ष अरुण कुलकर्णी , गशिअ मा.सुभाष पवने सर, शिविअ मा.अनिल महामुने सर, केंद्र प्रमुख मा. आर. आर.जाधव सर,दहेली चे सरपंच राकेश तोटावर,उपसरपंच काळे, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंदांनी अभिनंदन करुन भावी शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

4 thoughts on “श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय, दहेलीची इयत्ता 10वी च्या परीक्षेत निकालाची परंपरा कायम

Leave a Reply