kinwat today news

दिव्यांग लाभार्थी निधी वाटपात मोठा भ्रष्टाचार झाला असून संबंधित ग्रामसेवकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा या मागणीसाठी अखिल भारतीय अपंग कामगार संघटना सचिव राज माहुरकर करणार उपोषण

दिव्यांग लाभार्थी निधी वाटपात मोठा भ्रष्टाचार झाला असून संबंधित ग्रामसेवकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा या मागणीसाठी अखिल भारतीय अपंग कामगार संघटना सचिव राज माहुरकर व शहराध्यक्ष सलाम बागवान यांनी दिनांक 14 ऑगस्ट पासून उपोषणास पंचायत समिती कार्यालयासमोर बसणार असल्याचे लेखी निवेदन गटविकास अधिकारी यांना दिले आहेत.

सन 2016 पासून दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावरून ग्राम पंचायत स्तरावर त्याची अंमलबजावणी करण्यासंबंधाने शासन द्वारे किनवट पंचायत समितीअंतर्गत संघटनेच्या लाभार्थ्यांची थकीत चालू वर्षाचे सण 16 सोळा ते 20 वीस पर्यंत 3 टक्के दिव्यांग लाभार्थ्यांना ग्रामपंचायत स्तरावरून लाभार्थ्यांना निधी वाटप करण्यात आले असून तालुक्यात आज पर्यंत वाटप न झालेल्या ग्रामपंचायती आहे त्याच अनुषंगाने मौजे घोटी ग्रामपंचायतीअंतर्गत लाभार्थ्यांना 16 ते 19 पर्यंत ठेवून फक्त 20 19 ते 2020 मध्ये दाखवून त्यांना प्रत्येकी एक हजार रुपये प्रमाणे 24/ 7 /2020 रोजी साध्या वाउचर वर रक्कम अदा करण्यात आली असे माहिती अधिकारात मागण्यात आलेल्या माहितीमध्ये स्पष्ट दिसत आहे. गटविकास अधिकारी किनवट यांच्याकडे दिनांक 11/ 5/ 2020 रोजी गोकुंदा येथील दिव्यांग लाभार्थी यांच्यावतीने माहिती अधिकार देण्यात आल्या वरून पंचायत समितीने जन माहिती अधिकारी यांच्याकडून सदर माहिती अर्जावर दिनांक 8/6/2020 पत्र क्रमांक 1442 नुसार पत्रासोबत एकूण 31 पाने पुरविण्यात आले असून त्यात एक प्रत माननिय उपमुख्य कार्यकारी अधिकारी( पंचायत) जिल्हा परिषद नांदेड माहिती देण्यात आली ग्रामपंचायतीचे जन माहिती अधिकारी पंचायत समितीचे जन माहिती अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीचे अवलोकन केले असता जन माहिती अधिकारी यांनी 19 ते 2020 मध्ये प्रति लाभार्थी दाखविण्यात आले आहेत तसेच पंचायत समिती ग्रामपंचायत याच्यातील पप्पा वरती 44 हजार रुपयांचा अपहार केल्याचा आरोप अखिल भारतीय अपंग कामगार संघटना किनवट शहर अध्यक्ष सलाम बागवान व तालुका सचिव राज माहुरकर यांनी लेखी तक्रार गटविकास अधिकारी किनवट यांच्याकडे केली असून 14 ऑगस्टच्या आत संबंधित ग्रामसेवकावर तात्काळ फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे अन्यथा पंचायत समिती किनवट समोर 14 ऑगस्ट पासून उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. सदरील निवेदनाची प्रती उपविभागीय विभागीय अधिकारी किनवट, तहसीलदार किनवट व पोलीस स्टेशन किनवट यांना देण्यात आले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

3 thoughts on “दिव्यांग लाभार्थी निधी वाटपात मोठा भ्रष्टाचार झाला असून संबंधित ग्रामसेवकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा या मागणीसाठी अखिल भारतीय अपंग कामगार संघटना सचिव राज माहुरकर करणार उपोषण

Leave a Reply