kinwat today news

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे -मा.रामदास आठवले(केंद्रीय न्याय मंत्री)

किनवट टुडे न्युज:
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर “भारतरत्न” या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी भारताचे सामाजिक न्याय मंत्री मा. रामदासजी आठवले यांनी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्याकडे केली आहे.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल बोलताना रामदास आठवले म्हणाले की, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक ज्यांनी महाराष्ट्रातील मध्यमवर्ग, शोषित, पीडित, दुर्बल, श्रमिक यांच्या दुःख आणि समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य केले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये सहभाग घेऊन या आंदोलनात तसेच गोवा मुक्तिसंग्राम यासाठी अनेक पोवाडे गायलेले आहेत.

आपल्या शाहिरीच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर ही राजकीय तसेच सामाजिक प्रश्नाच्या संबंधांमध्ये त्यांनी जनजागृती केलेली आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी आपले जीवन भेदभाव न करता सर्व लोकांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते आणि मला आपणास कळविण्यात आनंद वाटतो की,यावर्षी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी वर्ष आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकार ने त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त केंद्र सरकार यांच्या सहयोगाने डाक तिकीट प्रकाशित करुन त्यांना आदरांजली वाहिली आहे.
त्यामुळे मी आपणास निवेदन करतो कि, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या योगदानामुळे, त्यांनी केलेल्या लोक कल्याणाच्या कार्यामुळे त्यांना केंद्र शासनाच्या वतीने सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या “भारतरत्न” ह्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात यावे. अशी मागणी केंद्राचे सामाजिक न्यायमंत्री मा.रामदास आठवले त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

5 thoughts on “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे -मा.रामदास आठवले(केंद्रीय न्याय मंत्री)

Leave a Reply