30 जून 2020 रोजी पर्यंत ऑनलाईन नोंदणी केलेल्या  शेतकर्‍यांच्या ज्वारी खरेदीला मुदतवाढ द्या :- संतोष डोणगे पाटील

किनवट (तालुका प्रतिनिधी)

कोवीड 2019 ने सर्व जगामध्ये हाहाकार पसरविला असता सध्या किनवट तालुक्यातील शेतकऱ्याने ज्वारी विक्रीसाठी ऑनलाईन केली होती. तरी सदर ऑनलाईन केलेली ज्वारी शेतकऱ्याकडे शिल्लक आहे म्हणून शेतकऱ्यांची ज्वारी खरेदीसाठी मुदतवाढ शासना कडून देण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना तालुका अध्यक्ष श्री संतोष जी डोणगे पाटील यांच्या तर्फे शासनाला सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालय तालुका किनवट जिल्हा नांदेड यांच्यामार्फत देण्यात आले, सदर निवेदनामध्ये रब्बी हंगाम 2019- 2020 मधील आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरडधान्य, मका ,ज्वारी खरेदी केंद्र इस्लापूर व चिखली येथे मंजूर झालेले असून सदर खरेदी केंद्रावर मका व ज्वारी खरेदी करण्यात आली होती .सदर भरडधान्य दिनांक 30 जून 2020 अखेर पर्यंत खरेदी करण्याची मुदत दिली होती .

दरम्यान या तारखेपर्यंत किनवट तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करून नोंदणी केली होती. मात्र नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची ज्वारी शासनाने खरेदी केली नाही तर ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली नाही अशा शेतकऱ्यांना यापूर्वी अनेकदा विनंती अर्ज करून खरेदी केंद्राला मुदतवाढ मिळावी म्हणून मागणी केली मात्र शासनाने ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची ज्वारी अद्यापही खरेदी केले नाही. तसेच ऑनलाईन नोंदणी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मुदत वाढ देखील दिली नाही. विशेष म्हणजे उपप्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय किनवट नै ज्वारी खरेदी साठी मुदतवाढ मिळणार असल्याचे सांगून शेतकऱ्यांना गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत ठेवले. मुदतवाढ मिळेल या आशेने हजारो शेतकर्‍यांनी ज्वारी घरीच ठेवली. याचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी अडचणीत असलेल्या शेतकऱ्याकडून कवडी मोल भावात ज्वारीची खरेदी सुरू केली असून ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांचे यामुळे अत्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एकीकडे कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे मागील तीन ते चार महिन्यापासून लाकडाऊन सुरू असल्यामुळे तसेच कर्ज बाजाराने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यावर आत्महतेची वेळ आलेली असताना दुसऱ्या बाजूने शासन शेतकऱ्याचे धान्य खरेदी करायास दिरंगाई करत असल्याने किनवट तालुक्यातील शेतकरी हैराण आहे. म्हणून शेतकऱ्यावर आढवलेली बिकट परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने नोंदणी केलेल्या किनवट तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची शिल्लक असलेली ज्वारी खरेदी करावी . तसेच ऑनलाइन नोंदणीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना मुदतवाढ देऊन दिलासा द्यावा. अन्यथा सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचे निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयात श्री संतोष पाटील यांनी दिलेले आहे.

शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचे प्रश्न श्री संतोष धोंडगे पाटील हे नेहमी उचलून धरतात व शासनाला शेतकऱ्या अनुकूल असे परिस्थिती निर्माण करण्यात भाग पाडण्याचा प्रयत्न करतात.अशा प्रकारचे त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून ते सतत फक्त समाजकारण हा उद्देश ठेवूनत्यांनी आतापर्यंत कार्य केलेले आहे. शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न उचलून धरून शेतकऱ्यांना मदत व्हावी तसेच श्री संतोष पाटील यांच्या सामाजिक कार्याला यश मिळावे असे सर्वसामान्य शेतकऱ्याकडून बोलल्या जात जात आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.

5 thoughts on “30 जून 2020 रोजी पर्यंत ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांच्या ज्वारी खरेदीला मुदतवाढ द्या :- संतोष डोणगे पाटील

Comments are closed.