kinwat today news

पाण्यात बुडून तीन शाळकरी विध्यार्थींचा दुर्देवी मृत्यू; किनवट तालुक्यातील चिखली(ई) येथील दुर्देवी घटना

शिवणी (प्रतिनिधी)किनवट तालुक्यातील चिखली(ई)येथे तीन शाळकरी विध्यार्थींचा पाण्यात बुडुन मृत्यू
शिवणी पासून १० की.मी. अंतरावर असलेले चिखली(ई) गावातील तीन बाल विध्यार्थी पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याने चिखली गावासह शिवणी परिसरात शोककळा पसरली ह्यात रितेश विठ्ठल देशट्टीवाड वय ११,गंगाधर लक्ष्मण भंडरवाड वय १३,श्रीकर गोपाळ नागुवाड वय १३ असून हे सर्व शाळकरी विद्यार्थी आहेत.
घटनेची सविस्तर माहिती अशी की चिखली ते म्हैसा रोडवर गावलगत नाला असून मागील काही दिवसात पाणी भरपूर पडल्याने परिसरातील नदी नाले वाहू लागले त्यात या विद्यार्थ्यांना पोहण्याची आवड निर्माण झाल्याने चिखली(ई) येथील विद्यार्थी पोहण्यासाठी गेले असे कळले हे तीन विद्यार्थी सह इतर विध्यार्थी ही पोहण्यासाठी गेले पण एकालाही पोहणे येत नसल्याने ही तिघे जण पाण्यात बुडून मृत्यू पावले
वरील तिघे आदी पोहण्यासाठी पाण्यात उतरले बराच वेळ झाल्यानंतर आपले सहकारी पाण्यात कुठे दिसून येत नासल्याने ह्यांना हाक मारण्याचा प्रयत्न केले पण थोडयाच वेळात दोन मृत शरीर पाण्यात तरंगत असल्याने नाल्याकाठी बसून असलेले बाल विध्यार्थी जोरजोराने हाका व आवाज दिल्याने आजूबाजूला शेतात काम करणारे शेतकरी धावून नाल्याजवळ येऊन पाहतात तर दोन मृत देह पाण्यात तरंगताना दिसून आल्यास शेतकऱ्यांनी लगेच पाण्यात उतरून त्या दोन मृत देहांना बाहेर काढले पण हे विध्यार्थी आपला सोबत असलेला रितेश दिसून येत नसल्याने शेतकऱ्यांना कळविले तेथील शेतकरी पुन्हा पाण्यात उड्या मारून तिसऱ्या मुलाला पाहण्यासाठी प्रयत्न केले असता त्या तिसऱ्या चे शरीर नाल्याच्या कडेला पडून दिसले शरीर गरम व थोडे स्वसोस्वास असले असेलक्षात आल्याने त्या बालकाला लगेच दुचाकी वाहनावर बसून प्रार्थमिक आरोग्य केंद्र शिवणी येथे आणण्यात आले
तपासणी अंती वैद्यकीय अधिकारी डॉ. कानिफनाथ मुंडे यांनी मृत घोषित केले आणि पोलिसांना माहिती दिली वरील दोन व हा एक असे तीन शाळकरी विध्यार्थींचे पाण्यात बुडवून मृत्यू झाले या घटनेची इस्लापुर पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यू ची नोंद करण्यात आली आणि तीन ही मृत शरीराची शवविच्छेदन करून मृतदेह परिवाराच्या स्वाधीन करण्यात आले या घटनेची माहिती चिखली येथील सरपंच देविदास तोटवाड विठ्ठल शिंगरवाड सुरेश झरीवाड यांना कळताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ इस्लापुर पोलीस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत कागणे व उपसहायक निरीक्षक श्रीकांत कांदे पोलीस कर्मचारी रामेश्वर आलेवाड, संदीप साळवे,मंडळ अधिकारी सानप यांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला सदरील माहिती तालुक्यात वाऱ्यासारखे पसरले ही बातमी कळताच कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बालाजी आलेवार,शिवसेनेचे गजानन बच्छेवार, भोजराज देशमुख,यांनी सांत्वन केले

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

5 thoughts on “पाण्यात बुडून तीन शाळकरी विध्यार्थींचा दुर्देवी मृत्यू; किनवट तालुक्यातील चिखली(ई) येथील दुर्देवी घटना

Leave a Reply