kinwat today news

आर्टीची ” स्थापना व अण्णाभाऊ साठे यांना ” भारतरत्न”पुरस्कार द्यावा या मागणीसाठी अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्य वतीने उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार

नांदेड: महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या वतीने ” आर्टीची ” स्थापना शासनाने करावी व जागतिक किर्तीचे थोर साहित्यीक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना ” भारतरत्न ” हा सर्वोच्च किताब केंद्रशासनाने प्रदान करून सन्मानानित करण्यात यावे,अशा प्रकारच्या दोन मागण्या राज्य शासनाकडे मातंग समाजाकडून मोठ्या प्रमाणात होत आहेत,अशा आशयाचे निवेदने समाजाने mail द्वारे,online पाठवलेले आहेत.
राज्यशासनाने मातंग समाजाच्या वरिल मागण्या ची तातडीने दखल घेवुन, या मागण्या मंजुरीची कार्यवाही शासनस्तरावरून सुरू होणेसाठी, मागणीची ,आंदोलनाची तिव्रता वाढविण्यासाठीचा एक भाग म्हणुन , पहिला टप्पा म्हणुन वरिल मागण्या चे निवेदन ” मा. मुख्यमंत्री,व उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य,” यांना “मा. जिल्हाधिकारी साहेब,नादेड ” यांचे मार्फत शिष्टमंडळाद्वारे उद्या दिनांकः २९ जुलै २०२० रोजी दुपारी ठिकः १.०० देण्यात येणार आहे.
तरी समाजातील कार्यकर्ते यानी उद्या दिनांकः २९ जुलै २०२० रोजी दुपारी ठिकः १.०० वा मा.जिल्हाधिकारी कार्यालय,नांदेड येथे उपस्थित राहाण्याची संस्थापक-अध्यक्ष अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्य वैयक्तिक पातळीवर विनंती केली आहे.

,

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

3 thoughts on “आर्टीची ” स्थापना व अण्णाभाऊ साठे यांना ” भारतरत्न”पुरस्कार द्यावा या मागणीसाठी अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्य वतीने उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार

Leave a Reply